Friday, April 26, 2024
Homeनाशिकपर्यटकांसाठी बोटक्लब खुले

पर्यटकांसाठी बोटक्लब खुले

नाशिक । प्रतिनिधी Nashik

गंगापूर धरणातील (Gangapur Dam) बहुचर्चित बोटक्लब ( Boat club) अखेर पर्यटकांसाठी खुला करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

- Advertisement -

नाशिक जिल्ह्यातील करोना सद्यस्थीती आढवा बैठक आज पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली.

त्यात बोट क्लब काही अटी शर्तीवर चालु करण्यास मान्यता देण्यात आली. यावेळी जिल्हाधीकारी सुरज मांढरे, पोलीस आयुक्त दीपक पांडेय, पोलिस अधीक्षक सचीन पाटील आदींसह वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पन्नास टक्के क्षमतेने हा बोटक्लब सुरु करण्याच्या सूचना पालकमंत्री भुजबळ यांनी दिल्या. करोना नियमांचे पालन करून ऑनलाईन बुकिंगच्या माध्यमातून पर्यटकांना सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुुळे पर्यंटकांना काही अंशी दिलासा मिळणार आहे.

नाशिक जिल्ह्यात रात्री आठपर्यंत व्यवहार सुरु आहेत. हॉटेल रेस्टॉरंटसाठी बंधने आहेत. त्यांनाही रात्री अकरा पर्यंत सवलत हवी आहे. मात्र, रेस्टॉरंटसचा निर्णय घेणे आपल्या हातात नाही. करोनाविरुद्ध लढण्यासाठी एकीकडे पाऊले उचलली जात असतांना त्या उपाययोजनांचा हरताळ फासणारे निर्णय घेणे शक्य होणार नाही, काही निर्णय राज्यस्तरावर घेण्यात येणार असून मुंबईच्या टास्क फोर्स याबाबतचे निर्णय घेणार आहे. असे सांगत रेस्टॉरंटबाबतचा निर्णय टास्क फोर्स घेणार असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या