SSC HSC Exam : दहावी आणि बारावी विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी, वेळेत झाला मोठा बदल

jalgaon-digital
1 Min Read

मुंबई | Mumbai

महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी (SSC) आणि बारावी (HSC) परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. विद्यार्थी हित लक्षात घेऊन व पालक विद्यार्थी यांच्या मागणीचा विचार करून दहावी बारावी बोर्ड परीक्षेत प्रत्येक पेपरच्या निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटे परीक्षेसाठी वाढून मिळणार आहे.

याआधी दहावी बारावी बोर्ड परीक्षेमध्ये प्रश्नपत्रिका निर्धारित वेळेच्या दहा मिनिटे आधी आकलनासाठी वाचनासाठी दिल्या जात होत्या. मात्र यामुळे कॉपीच्या घटना समोर येत असल्याने दहा मिनिटे आधी प्रश्नपत्रिका देण्याचा नियम बोर्डाने या वर्षीपासून रद्द केला आहे. मात्र विद्यार्थ्यांना आता पेपर लिहिण्यासाठी निर्धारित वेळेपेक्षा १० मिनिटं जास्त वेळ मिळणार आहे.

भयंकर! हॉटेलच्या ४२ व्या मजल्यावरून दगड कोसळून दोघांचा जागीच मृत्यू, वाहनांचाही चुराडा

दरम्यान राज्यात मधल्या दोन वर्षांच्या काळात करोना संकटामुळे (Corona Pandemic) दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष परीक्षा केंद्रावर न जाता ऑनलाईन परीक्षा द्यावी लागली होती. विशेष म्हणजे सर्वच इयत्तेच्या विद्यार्थ्यांची परीक्षा मधल्या दोन वर्षाच्या काळात ऑनलाईनच झाली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांचा लिहिण्याचा सराव कमी झाल्याचं पालकांचं मत आहे. पालकांच्या याच मताचा विचार करुन दहावी-बारावी परीक्षा बोर्डाने विद्यार्थ्यांच्या हिताचा अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

न्यूझीलंडमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के! रिश्टर स्केलवर ६.१ तीव्रता

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *