Friday, April 26, 2024
Homeनाशिकसारडा विद्यालयात शनिवारी रक्तदान शिबिर

सारडा विद्यालयात शनिवारी रक्तदान शिबिर

सिन्नर । प्रतिनिधी Sinnar

येथील शेठ ब. ना. सारडा विद्यालयाचे उदार देणगीदार वै. बस्तीरामजी नारायणदास सारडा यांच्या 56 व्या पुण्यतिथीनिमित्त शनिवारी (दि.19) सारडा विद्यालय व ‘देशदूत’ यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्राचार्य अनिल पवार, पर्यवेक्षक सुनील हांडे यांनी दिली.

- Advertisement -

शाळेच्या प्रांगणात सकाळी 9.00 वाजता शिबिराचे ‘देशदूत’च्या कार्यकारी संपादक डॉ. वैशाली बालाजीवाले यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. विद्यालयाच्या शालेय समितीचे अध्यक्ष बापूसाहेब पंडित अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. शिबिरात लघुउद्योग भारती, ओम साई फाऊंडेशन, साई सुख-दु:ख बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, पुरोहित संघ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, माहेश्वरी सुरभी मंडळ, माहेश्वरी युवक मंडळ, माहेश्वर समाज सहभागी होणार आहेत.

वै. सारडा यांच्या पुण्यतिथी दिनी चार वर्षांपासून सारडा विद्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. जनकल्याण रक्तपेढीच्या सहाय्याने हे शिबिर पार पडणार आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात रक्ताचा तुटवडा भासत आहे. करोनाच्या रुग्णांना थेट रक्त पुरविण्याचे काम या शिबिराच्या माध्यमातून होणार आहे. शहरासह तालुक्यातील रक्तदात्यांनी या शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन प्राचार्य पवार, हांडे यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या