Friday, April 26, 2024
Homeनाशिकरक्तदान आणि ज्ञानदान सर्वश्रेष्ठ दान: बनकर

रक्तदान आणि ज्ञानदान सर्वश्रेष्ठ दान: बनकर

पिंपळगाव ब.। प्रतिनिधी | Pimpalgaon Basvant

आपल्या कुटुंबातील दिवंगत घटकांच्या स्मृती सातत्यपूर्ण रक्तदाना (blood donation) सारख्या अनोख्या सामाजिक उपक्रमातून वर्षानुवर्षे राबविणे कठीण काम आहे. मात्र त्या रक्तदानातून हजारो नागरीकांना फायदा होतो.

- Advertisement -

तसेच आमदार दिलीप बनकर (MLA Dilip Bankar) आणि परिवाराने शाळेच्या माध्यमातून ज्ञानदानाचे काम सुरु केले. रक्तदान (blood donation) आणि ज्ञानदान (Donation of knowledge) हे खरोखरच सर्वश्रेष्ठ दान आहे असे प्रतिपादन निसाका (NISAKA) मा. चेअरमन तानाजी बनकर (former chairman tanaji bankar) यांनी केले आहे.

आमदार दिलीप बनकर (MLA Dilip Bankar) यांचे पिताश्री स्व.शंकर बनकर, बंधू स्व. अशोक बनकर आणि स्व.विलास बनकर याच्या 31 व्या स्मृतीदिनानिमित्त जोपूळ रोडवरील भिमाशंकर इंग्रजी माध्यमाच्या हायस्कूलमध्ये काल बुधवार दि.3 रोजी सकाळी 9.30 वाजता रक्तदान शिबिराचा (Blood donation camp) शुभारंभ करण्यात आला.

त्यावेळी बनकर बोलत होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात येवून आमदार दिलीप बनकर (MLA Dilip Bankar) यांच्या उपस्थितीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र पगार, तालुकाध्यक्ष राजेंद्र डोखळे, निफाड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बाळासाहेब बनकर, अशोक शाह, संपत विधाते, प्रा.आर.पी. मोरे, विश्वास मोरे, रवींद्र मोरे, सोमनाथ मोरे, रामभाऊ माळोदे, सुरेश खोडे, निवृत्ती धनवटे, विलास बोरस्ते, माधव ढोमसे,

नारायण पोटे, शंकरलाल ठक्कर, शरद काळे, गफ्फार शेख, बाळा बनकर, राजेंद्र खोडे, महेंद्र गांगुर्डे, लक्ष्मण खोडे, गणेश बनकर, अरविंद जाधव, उमेश जैन, चंद्रकांत राका, प्रवीण कागदे उपस्थित होते. यावेळी रामभाऊ माळोदे यांनी सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. सोमनाथ मोरे यांनी रक्तदानाचे महत्व विषद केले. दिलीप बनकर यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात आई-वडील आणि माझे दिवंगत बंधूंच्या स्मृतिदिनी सातत्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करून हा सामाजिक उपक्रम राबवीत आहोत.

करोनाच्या काळातही हा उपक्रम खंडीत राहिला नाही. त्यामध्ये शहरासह तालुक्यातील मित्र परिवाराचे मोठे योगदान आहे. काल दिवसभर रक्तदानासाठी तरुणांनी मोठी गर्दी केली होती. रक्तदान शिबिर यशस्वीतेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व आमदार दिलीप बनकर समर्थकांनी विशेष परिश्रम घेतले. गणेश बनकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. याप्रसंगी तालुक्यातील नागरिक व तरूण वर्ग उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या