नववर्षाचा पहिला दिवस ठरला ‘घात’वार! फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट, अनेकांचा मृत्यू झाल्याची माहिती

jalgaon-digital
3 Min Read

सोलापुर | Solapur

एकीकडे सगळीकडे नववर्षाच्या स्वागत केले जात आहे, तर दुसरीकडे वर्षाचा पहिला दिवसही अनेकांसाठी आयुष्याचा शेवटचा दिवस ठरतोय.

नाशिकच्या इगतपुरी तालुक्यात जिंदाल कंपनीत स्फोट झाल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे कंपनीत आग लागली. ही आग विझवण्याचं काम अजून सुरुच असताना सोलापुरातून आणखी एक अतिशय वाईट आणि दुर्देवी घटना समोर आलीय.

नवीन वर्ष, नवे नेते…! किरीट सोमय्यांचे जोरदार प्लॅनिंग, ‘या’ ५ नेत्यांची नावं केली जाहीर

सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शीत एका फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत स्थानिकांच्या दाव्यानुसार काहींचा मृत्यू झाला आहे. बार्शी तालुक्यात हा फटाक्यांचा कारखाना आहे.

आज या कारखान्यात स्फोट झाला. तब्बल चार एकरात पसरलेल्या कारखान्यात ४० जण काम करीत होते. आज स्फोट होताच परिसतराली गावकरी तिथे धावले. या घटनेत काही लोकांचा मृत्यू झाल्याचं स्थानिक सांगत आहेत. तर दहा जण जखमी झाल्याचं सांगण्यात येतंय.

दिवसाढवळ्या महिलेच्या अपहरणाचा प्रयत्न, घटना CCTV कॅमेरात कैद

बार्शीतील अग्निशामक यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असून पोलिसांची टीमही दाखल झाली आहे. जखमींना उपचारासाठी रूग्णालयात नेण्यात येत आहे. मोठया प्रमाणात आग लागल्याने मयताची संख्या वाढण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. कारखान्यातून आगीचे लोट मोठ्या प्रमाणात येत असल्याने बचावकार्यास अडचणी निर्माण येत आहेत.

इगतपुरीतील अग्नितांडवात एका महिलेचा मृत्यू

इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव (Mundhegaon) येथील जिंदाल पॉलिफिल्म कंपनीत (Jindal Polyfilm Company)आज सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास कंपनीत भीषण आग लागल्याची घटना घडली.

त्यानंतर घटनास्थळाला जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Dr. Bharti Pawar) विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे (Radhakrishna Game) जिल्हाधिकारी डी.गंगाथरण यांच्यासह प्रशासकीय अधिकाऱ्यांनी भेट देत पाहणी करून परिस्थितीची माहिती घेतली. यानंतर विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी माध्यमांशी संवाद साधत घडलेल्या घटनेबद्दल अधिक माहिती दिली.

यावेळी गमे म्हणाले की, आतापर्यंत १४ जखमी कामगारांना रेस्क्यू करण्यात आले असून यातील एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच ११ जणांना सुयश हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून यातील चौघांची प्रकृती गंभीर आहे. तर उर्वरित दोघांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

तर डॉ. भारती पवार यांनी सांगितले की, कंपनीतील बॉयलरमचा भीषण स्फोट (Explosion) झाल्याने आग लागली. त्यावेळी आजूबाजूच्या गावांना याचा जोरदार धक्का बसला. त्यानंतर अग्निशमन दल आणि एनडीआरएचे पथक घटनास्थळी दाखल झाल्याने १४ जणांना रेस्क्यू करण्यात आले. तसेच जिल्हा शासकीय रुग्णालय, एसएमबीटी मेडिकल कॉलेज, वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयासह विविध रुग्णालयांत १०० बेड राखी ठेवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *