अहमदनगर | Ahmedagar
नगर शहरातील खड्डे, वाढते अतिक्रमण, जड वाहतूक अशा विविध प्रश्नांवर लक्ष वेधत
शिव राष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना काळे झेंडे दाखवून निषेध केला.
अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आज प्रजासत्ताक दिनानिमित्त नगर शहरात असून सकाळी पोलीस मुख्यालयात होणार्या कार्यक्रमाला जात असताना लालटाकी परिसरात काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केला. शहरातील विविध प्रश्नांवर पालकमंत्री यांचे दुर्लक्ष म्हणून निषेध नोंदवला आहे. शिव राष्ट्र सेनेचे अध्यक्ष संतोष नवसुपे, माजी नगरसेवक अनिल शेकटकर यांच्यासह शिव राष्ट्र सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.