Friday, April 26, 2024
Homeजळगावनेत्यांच्या निर्णयाने भाजपा कार्यकर्ते नाराज

नेत्यांच्या निर्णयाने भाजपा कार्यकर्ते नाराज

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Jalgaon Agricultural Produce Market Committee) जागा वाटपाचा (Allotment of seats) निर्णय दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून घेण्यात आल्याची चर्चा आहे. शिवसेना शिंदे (Shiv Sena Shinde group) गटाला 11 जागा तर भाजपाच्या (BJP) वाटेला 7 जागांवर बोळवण करण्यात आल्याने भाजपा कार्यकर्त्यांमध्ये (Discontent among BJP workers) नाराजी असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे. मात्र, दोन्ही गटाकडून अधिकृत उमेदवारांची यादी दि.20 एप्रिल रोजी अंतीम माघारीनंतर जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

- Advertisement -

भाजपा-शिवसेना शिंदे गट युती आणि महाविकास आघाडीसाठी जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रतिष्ठेची झालेली आहे. युती आणि आघाडीमध्ये आमने-सामने सामना रंगणार असल्याने दोन्ही गटाकडून जळगाव कृउबा समितीसाठी जोरदार तयारी सुरू झालेली आहे. भाजपा-शिवसेना शिंदे गटात युतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून ठरला असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, राज्यात भाजपा-शिवसेना शिंदे गटाची सत्ता असून सर्वाधिक आमदार 105 भाजपाकडे आहे. शिंदे गटाचे फक्त 40 आणि अपक्ष 10 असे एकूण 50 आमदार त्यांच्याकडे आहेत.

जळगाव बाजार समितीसाठी भाजपाचा पदाधिकार्‍यांनी समसमान जागा वाटप मागणी लावून धरली होती. तसा बैठकीत देखील कार्यकर्त्यांचा सूर उमटला होता. मात्र, भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता परस्पर जागा वाटपाचा निर्णय घेतल्याने भाजपाच्या वाटेला 7 जागांवर बोळवण करण्यात आहे. त्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा रंगत आहे. आता दि. 20 एप्रिल रोजी माघारीनंतर भाजपाकडून त्या-त्या मतदार संघात वर्चस्व असलेला उमेदवार जातनिहाय व गटनिहाय उमेदवार दिला जाईल,अशी भाजपाची भूमिका आहे.

युतीचा सात-अकराचा फॉर्म्युला

जळगाव कृउबा समितीमध्ये एकूण 18 जागांपैकी 11 जागांवर शिवसेना शिंदे गट तर 7 जागांवर भाजपा निवडणूक लढणार आहे. यात सोसायटी व ग्रामपंचायत गटातून 6 जागा तसेच व्यापारी गटातून एक जागा भाजपाच्या वाटेला सोडण्यात आली असल्याची माहिती मिळाली आहे. तर शिवसेना शिेंदे गटाला 11 जागा देण्याचा निर्णय झाला आहे.मात्र अद्याप युतीकडून अधिकृत उमेदवारांची घोषणा करण्यात आली नाही.

माजी सभापतींची माघारीची भूमिका

शिवसेना शिंदे गटातून इच्छुकांमध्ये माजी सभापती कैलास चौधरी यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. मात्र, शिवसेना शिंदे गटाकडून इच्छुकांची संख्या जागा वाटपापेक्षा अधिक असल्याने आपल्या नेत्याला डोकेदुखी ठरु नये, म्हणून या निवडणुकीतून माघार घेण्याची भूमिका जळगाव बाजार समितीचे माजी सभापती कैलास चौधरी यांनी स्पष्ट केली.

युतीसमोर महाविकास आघाडीचे आव्हान

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी युती व महाविकास आघाडीकडून पॅनल होण्यापुर्वीच गावा गावात प्रचार सुरू केला आहे.प्रत्येक गटाचे उमेदवार ग्रामपंचायत व सोसायटीच्या सदस्यांची भेट घेवून चर्चा करत आहे. त्यामुळे चुरस वाढली आहे. भाजप-शिवसेना शिंदे गट युतीला आव्हान देण्यासाठी महाविकास आघाडीने देखील मोट बांधली असून त्यांच्यादेखील बैठका आणि भेटीगाठी वाढल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या