Friday, April 26, 2024
Homeनगरहे तर पळकुटे मंत्री

हे तर पळकुटे मंत्री

अहमदनगर|Ahmedagar

कोकणामध्ये पूर परिस्थिती ( Flood situation in Konkan) निर्माण झाली आहे. त्याठिकाणी पाहणी करून तात्काळ मदत मिळाली पाहिजे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray) बाहेर पडले त्यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी (Survey of flooded area) केली त्यांचे अभिनंदन केले पाहिजे. परंतु रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब (Anil Parab, Guardian Minister of Ratnagiri) यांनी त्याठिकाणाहून काढता पाय घेतला. हे पळकुटे मंत्री असल्याची खोचक टीका भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ (BJP’s state vice president Chitra Wagh Criticism) यांनी केली. नेहमी केंद्राकडे बोट दाखविणार्‍या खा. संंजय राऊत (MP Sanjay Raut) यांचाही त्यांनी समाचार घेतला.

- Advertisement -

शनिवारी प्रदेश उपाध्यक्ष वाघ या नगरमध्ये आल्या होत्या. यावेळी आयोजित पत्रपरिषदेत त्यांनी राज्य सरकारच्या कारभारावर टिका केली. त्या म्हणाल्या, राज्यात पूरपरिस्थितीती निर्माण झाली आहे. त्याठिकाणी प्रथम विरोधीपक्षाचे नेते गेले व त्यांनी लोकांना मदत केली. सरकारला मदत करण्यास भाग पाडले. अतिवृष्टीच्या ठिकाणी लोकांना मदत करण्याचे सरकारचे कर्तव्य आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी मातोश्रीवरून पंढरपुरला जाताना जे ड्रायव्हिंग स्किल दाखविले ते त्यांनी कोकणात दाखवायला पाहिजे होते, तेथे लोक मदतीसाठी वाट पाहत आहे.

राज्य सरकारने वेळेत मदत दिली नसल्याचे वाघ यांनी सांगितले. मदतीसाठी प्रत्येकवेळी केंद्राकडे बोठे दाखविणार्‍या खा. राऊत यांच्यावर बोलताना त्या म्हणाल्या, केंद्र सरकार मदत करणार परंतु, राज्य सरकार म्हणून आपली काही जबाबदारी आहे, ती आपण निभावयला पाहिजे, फक्त सकाळी उठले की केंद्राच्या नावाने ओरडायचे नसते, असा टोला त्यांनी खा. राऊत यांना लगावला.

- Advertisment -

ताज्या बातम्या