..हे तर प्रेताच्या टाळू वरचे लोणी खाणारे सरकार

jalgaon-digital
2 Min Read

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

राज्याचे महाविकास आघाडीच्या सरकारला कुठल्याचे प्रश्नाचे गांर्भीर्य नाही. हे निष्क्रीय, निध्रिस्त, भ्रष्टाचारात अडकलेले आणि प्रेताच्या टाळु वरचे लोणी खाणारे सरकार असल्याचे टिका भाजपाचे प्रदेश प्रवक्ता लक्ष्मन सावजी यांनी केली आज पत्रकार परिषदेत केली.

शहरातील राम पॅलेस येथे झालेल्या पत्रकार परिषदेला खा. डॉ. सुभाष भामरे, महापौर चंद्रकांत सोनार, महानगर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, हिरामण गवळी आदी उपस्थित होते.

यावेळी प्रवक्ता लक्ष्मण सावजी म्हणाले की, राज्याच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती होती. जनतेने युतीला जनादेश दिला होता. मात्र शिवसेनेने भाजपाचा विश्वासघात आणि जनतेच्या आदेशाचा अवमान केला.

दरम्यान राज्यातील महाविकास आघाडी सरकाला एक वर्ष पुर्ण झाले आहे. या सरकारने प्रथम आगोदरच्या सरकारने केलेले चांगले उपक्रम मोडीत काढले.

कोरोना हाताळणीतही या सरकाराला अपयश आले आहे. नागरिकांना या काळात कुठल्याही चांगल्या सुविधा दिल्या नाहीत.

उलट केंद्र सरकारने दिलेल्या सुविधा देखील जनतेपर्यंत पोहोचविण्यातही हे सरकार अपयशी ठरल्याचा आरोपही त्यांनी केला.

केंद्र सरकारने पाठविलेले धान्यही या सरकारला नागरिकांपर्यंत निट पोहोचविता आले नाही. हे धान्य परस्पर माफियांना विकले गेल्याच आरोपही त्यांनी प्रवक्ता सावजी यांनी केला.

करोना काळात उद्योग, धंदे बंद असतांना या सरकारने मदत करण्याऐवजी नागरिकांना वाढीव विज बिले दिले. अती वृष्टी, अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देखील या सरकारने व्यवस्थीत दिली नाही.

हे नियोजन शुन्य सरकार असल्याची टिकाही त्यांनी केली. या सरकारला मराठा आरक्षणाचेही गांभीर्य नाही. या महाविकास आघाडी सरकारच्या एका वर्षाच्या कालावधीचे वर्णन करायचे म्हणजे हे जुलमी, निष्क्रिय, घूमजाव, स्थगिती, गोंधळ आणि गदारोळने परिपुर्ण गेल्याचे असेच करावे लागेल, अशीही टिका त्यांनी केली.

पत्रपरिषदेत प्रवक्ता सावजी यांनी नाईक कुटुंबप्रकरण, पत्रकार अर्णव गोस्वामी, अभिनेत्री कंगणा रणौत, महिलांवरील अत्याचार, मराठा आरक्षण या मुद्यांवरही लक्ष वेधले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *