Thursday, April 25, 2024
Homeनगरभाजपा प्रदेशाध्यक्षांविषयी फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट

भाजपा प्रदेशाध्यक्षांविषयी फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याविषयी फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी संदीप खामकर (रा. निंबोडी ता. नगर) याच्याविरूध्द भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

ज्ञानेश्वर प्रभाकर काळे (वय 51 रा. तेलीखुंट) यांनी फिर्याद दिली आहे. काळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मी 12 सप्टेंबर रोजी घरी असताना रात्री साडेनऊ वाजता माझ्या मोबाईलवर फेसबुक पाहत होतो. आ. बावनकुळे याचे फेसबुक पेजला मी जॉर्डन असुन मी फेसबुक पाहत असताना संदीप खामकर याने आ. बावनकुळे याचे फेसबुकला अर्वाच्य भाषा वापरून दोन गटात तेढ निर्माण होईल, असे कृत्य केले आहे.

आमचे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष यांची जनमानसात प्रतिमा मलिन होईल असा मजकुर खामकर याने लिहीला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास भिंगार कॅम्प पोलीस करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या