Friday, April 26, 2024
Homeनगरकृषी उत्पन्न बाजार समिती कर्मचार्‍यांना करोना योद्धा घोषित करा - कोल्हे

कृषी उत्पन्न बाजार समिती कर्मचार्‍यांना करोना योद्धा घोषित करा – कोल्हे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीतील ( Agricultural Produce Market Committee) बांधवांनी आपल्या जीवाची पर्वा न करता शंभर टक्के उपस्थिती देत शेतकरी वर्गाकडील माल खरेदी करून जीवनावश्यक मालाचा पुरवठा (Supply of essential commodities) केला आहे. तेव्हा कृषी उत्पन्न बाजार समितीतील कर्मचार्‍यांना करोना योद्धा (Corona Warrior) घोषित करून त्यांचे लसीकरण (Vaccination) तातडीने करावे, अशी मागणी भाजपाचे प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे (BJP Snehlata Kolhe) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray), आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांच्याकडे केली आहे.

- Advertisement -

त्या म्हणाल्या, करोना काळात कृषी उत्पन्न बाजार समितीतील प्रत्येक कर्मचारी व हमाल आदी बांधवांनी बजावलेली सेवा मैलाचा दगड ठरली आहे.या सर्व बांधवांनी आपला जीव धोक्यात घालून सर्व नियमांचे पालन करत शेतमाल खरेदीत मोलाची भूमिका बजावली.या बांधवांनी त्यांच्या जिवाचा विचार केला असता, तर राज्यात सर्वत्र अवघड स्थिती निर्माण होऊन शेतमाल तसाच खळ्यावर पडून राहिला असता, त्यातून अनेकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असते.

परंतु तसे न करता त्यांनी शेतकरी वर्गास आवाहन करून त्यांच्याकडील शेतमाल बाजार समितीत आणून त्याचे नियोजन चांगल्याप्रकारे हाताळले आहे. त्यामुळे त्यांची सेवा कौतुकास पात्र असून त्यांना करोना योद्धा जाहीर करून त्यांचे लसीकरण तातडीने पूर्ण करण्यात यावे.

- Advertisment -

ताज्या बातम्या