Thursday, April 25, 2024
Homeनगरभाजपा ओबीसी मोर्चा राहाता तालुक्याच्यावतीने शिर्डी पोलीस निरीक्षकांना निवेदन

भाजपा ओबीसी मोर्चा राहाता तालुक्याच्यावतीने शिर्डी पोलीस निरीक्षकांना निवेदन

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मी शिव्या तसेच मारहाण ही करू शकतो असे बेताल वक्तव्य करणार्‍या अहंकारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करावा या विषयाचे निवेदन भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आ. योगेश टिळेकर, आ. राधाकृष्ण विखे पाटील खा. सुजय विखे पाटील, जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांच्या सुचनेने ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब गाडेकर व जिल्हा उपाध्यक्ष अशोक पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुकाध्यक्ष स्वानंद रासने यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी भाजपा ओबीसी मोर्चा राहाता तालुक्याच्यावतीने शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गुलाबाराव पाटील यांना देण्यात आले.

- Advertisement -

यावेळी बोलतांना भाजपा ओबीसी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब गाडेकर म्हणाले की, भंडारा गोंदिया येथे काँग्रेस पक्षाच्या प्रचारार्थ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे गेले असता स्थानिक लोकांशी चर्चा करताना आवेशात येऊन मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिव्या देऊ शकतो तसेच मारु हीं शकतो असे वक्तव्य करून देशाच्या पंतप्रधान पदाची गरिमा घालवणारे तसेच मोदीजींचा अपमान करणार हे वक्तव्य आहे.देशात अराजकाता माजावण्याचा काँग्रेसचा डाव आहे. याप्रसंगी भाजपा ओबीसी मोर्चाचे तालुकाध्यक्ष स्वानंद रासने म्हणाले की आपण सर्वांनी बघितला असेल की गेल्या पाच तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विकास कामांच्या लोकार्पणासाठी पंजाबला गेले असताना काँग्रेसचे मुख्यमंत्री चन्नी यांनी स्थानिक काँग्रेसच्या गुंडांना शेतकर्‍यांच्या नावाखाली बसून पंतप्रधान मोदी यांचा जाणून बुजून रस्ता आडवला.

तसेच त्यांच्या जीविताला धोका उत्पन्न होईल असे कट कारस्थान रचले. त्यामुळे पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेत असलेल्या जवानांनी सुरक्षेच्या कारणास्तव मोदी यांचे पुढील सर्व कार्यक्रम रद्द केले. त्याचा निषेध करणे सोडून काँग्रेसच्या राहुल गांधी, पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी, नाना पटोले यांनी पंतप्रधानांची टिंगल वाढवण्यास सुरुवात केली.यावरून काँग्रेसच्या नेत्यांमध्ये पंतप्रधान मोदी यांच्याविषयी किती तिरस्कार भरलेला आहे हे लक्षात येते.पंतप्रधान मोदीजींच्या घातपताचा कारस्थान काँग्रेस व नाना पटोले यांनी आखला आहे.त्याचा आम्ही निषेध करतो.

देशातील गुप्तचर संस्थांनी पंतप्रधान मोदी यांच्या जीविताला धोका आहे असा अहवाल गृह विभागाला सादर केला आहे. देशाची सत्ता निवडणुकीच्या माध्यमातून आपण जिंकू शकत नाही.त्याच अनुषंगाने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मी मोदींना मारू शकतो हें जे विधान केले हे पंतप्रधान मोदी यांचा घातपाताचा एक भाग आहे का ? याची तपासणी राज्याच्या गृह विभागाने करावी अशी मागणी केली आहे. यावेळी भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब गाडेकर ओबीसी मोर्चाचे प्रभारी अशोक पवार, भाजपा ओबीसी मोर्चाचे तालुक्षध्यक्ष स्वानंद रासने, भाजपा पदाधिकारी धनंजय पाटील सरचिटणीस भिमराज मुर्तडक, योगेश बढे, युवा शहराध्यक्ष वैभव शिंदे, कैलास खोंडे, रावसाहेब कडलग, रघुनाथ कातोरे, सुनिल गाडेकर, दिपक आव्हाड, संजय जगताप व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या