Thursday, April 25, 2024
Homeनगरहल्ल्याचे समर्थन मुख्यमंत्री करत असतील तर राज्यासाठी धोक्याची घंटा - माजी आमदार...

हल्ल्याचे समर्थन मुख्यमंत्री करत असतील तर राज्यासाठी धोक्याची घंटा – माजी आमदार नरेंद्र पवार

अकोले |प्रतिनिधी| Akole

राज्यात होणार्‍या भाजपा कार्यालयावरील (BJP Office) हल्ल्याचे मुख्यमंत्री (CM) समर्थन करीत असतील तर ही राज्यासाठी धोक्याची घंटा आहे. ही मोगलाई आहे, असे मत भाजपा एन. टी. सेलचे प्रदेश संयोजक माजी आमदार नरेंद्र पवार (BJP N. T. Cell region co-ordinator Former MLA Narendra Pawar) यांनी व्यक्त केले.

- Advertisement -

अकोले (Akole) येथील भाजप कार्यालयात (BJP Office) पदवीधर निवडणूक संदर्भात आयोजित बैठकीत पवार बोलत होते. यावेळी धुळे (Dhule) येथील आदर्श शिक्षण संस्थेचे अध्यक्ष धनराज विसपुते, भाजपचे तालुकाध्यक्ष सिताराम भांगरे, सोशल मीडिया जिल्हा संयोजक भाऊसाहेब वाकचौरे, सरचिटणीस मच्छिंद्र मंडलिक, युवा अध्यक्ष राहुल देशमुख, अमोल येवले, प्रसन्न धोंगडे आदी उपस्थित होते.

माजी आमदार पवार (Former MLA Narendra Pawar) म्हणाले की, राज्यातील आघाडी सरकार जनमताचा अनादर करीत सत्तेवर आले असून मुख्यमंत्री (CM) पदावरच्या व्यक्तीला स्वातंत्र्य दिनाची माहिती नसेल तर अशा व्यक्तीने महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे.

जर भाजपा कार्यालयावर (BJP Office) कोणी हल्ला (attack) केला तर त्यास जशास तसे उत्तर देण्याची क्षमता भाजपा कार्यकर्त्यांत (BJP Workers) आहे. भाजपा हा विचारांचा पक्ष आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय देणारा पक्ष आहे.

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Revenue Minister Balasaheb Thorat) यांच्या जिल्ह्यात लोकप्रतिनिधीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या (Suicide) करावी वाटते अन महसूलमंत्री चकार शब्द काढत नाही ही घटना निषेधार्ह आहे. तर पदवीधर मतदारसंघाचे आमदार सुधीर तांबे (MLA Sudhir Tambe) हे शिक्षक, पदवीधर, बेरोजगार यांचे प्रश्न सोडविण्यास अपयशी ठरले आहेत, असाही आरोप श्री. पवार (Revenue Minister Balasaheb Thorat) यांनी केला आहे.

यावेळी कोविड काळात नरेंद्र पवार (Revenue Minister Balasaheb Thorat) यांनी मदत केली म्हणून अंबड चे माजी सरपंच दत्ता जाधव, प्रा. भूषण जाधव, शिक्षक परिषदेच्यावतीने राज गवांदे, भीमाशंकर तोरमल, विनायक साळवे, शिक्षण क्षेत्रात मदत केल्याबद्दल सुशांत वाकचौरे, एन टि सेलच्यावतीने राहुल चव्हाण, ओबीसी आघाडीच्यावतीने बाळासाहेब वाकचौरे यांनी सत्कार केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या