Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेशभाजप खासदारांच्या सहा वर्षांच्या नातीचा फटाक्यांमुळे मृत्यू

भाजप खासदारांच्या सहा वर्षांच्या नातीचा फटाक्यांमुळे मृत्यू

प्रयागराज | Prayagraj

भाजप खासदार रिटा बहुगुणा जोशी यांच्या सहा वर्षांची नात किया हिचा फटाक्यांमुळे मृत्यू झाला.

- Advertisement -

सोमवारी फटाके फोडताना कपड्यांना आग लागली आणि त्यामध्ये खासदार रिटा यांची नात किया हीचा मृत्यू झाला. रिया यांचा मुलगा मयंक जोशी यांची सहा वर्षांची मुलगी फटाके फोडत होती. दिवाळीचे फटाके फोडताना तिच्या कपड्यांनी पेट घेतला. त्यात ती गंभीर रित्या भाजली. उपचारासाठी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

डॉक्टरांनी कियाचे शरीर 60 टक्के भाजलं असल्याची माहिती कुटुंबियांना दिली. तिच्यावर प्रयागराजमधील एका रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र कियाची प्रकृती खालावत असल्याने तिला उपचारांसाठी दिल्लीला हलवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. मात्र दिल्लीला हलवण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला.

उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्या यांनी या घटनेसंदर्भात दुःख व्यक्त केलं आहे. तसेच मौर्या यांनी लहान मुलांना विस्फोटक आणि ज्वलनशील पदार्थांपासून दूर ठेवण्याचं आवाहन केलं होतं.

- Advertisment -

ताज्या बातम्या