Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्यादिल्लीत खळबळ; भाजप खासदार शर्मा यांचा संशयास्पद मृत्यू

दिल्लीत खळबळ; भाजप खासदार शर्मा यांचा संशयास्पद मृत्यू

दिल्ली | Delhi

राजधानी दिल्लीत धक्कादायक घटना घडली आहे. भाजपाचे खासदार…

- Advertisement -

राम स्वरुप शर्मा यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार शर्मा यांनी आत्महत्या केल्याचा संशय आहे. त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी ही घटना घडली आहे.

धक्कादायक! करोना लाॅकडाऊनच्या भीतीने तरुणाने केली आत्महत्या

मिळालेल्या माहितीनुसार, राम स्वरूप शर्मा हे भाजपाचे खासदार असून, ते हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी होते. दिल्लीतील आरएलएम रुग्णालयाजवळ खासदारांचं निवासस्थान आहे. याच खासदार निवासात ६२ वर्षीय शर्मा यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.

शर्मा यांच्या निवासस्थानातील कर्मचाऱ्यांने दिल्ली पोलिसांना ८.३० वाजता याची फोन करून माहिती दिली. शर्मा यांनी आत्महत्या केल्याचं कर्मचाऱ्याने पोलिसांना सांगितलं. त्यानंतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी शर्मा यांचा मृतदेह लटकेल्या अवस्थेत आढळून आला. शर्मा यांनी आत्महत्या का केली, याचा उलगडा अद्याप झालेला नाही. खासदार राम स्वरुप शर्मा यांच्या निधनानंतर भाजपची आज होणारी संसदीय बैठकही रद्द करण्यात आली आहे.

धक्कादायक! विद्यार्थ्याची वर्गातच गळफास घेत आत्महत्या

रामस्वरुप शर्मा हे हिमाचल प्रदेशातील जोगिंदरनगरचे रहिवासी आहेत. ते सलग दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कार्यरत होते. खासदार बनण्यापूर्वी ते मंडी जिल्ह्याचे भाजपचे सचिव होते. त्यानंतर हिमाचल प्रदेशचे भाजपचे सचिव होते. ते हिमाचल प्रदेशच्या फूड अँड सिव्हील सप्लाय कॉर्पोरेशनचे अध्यक्षही होते. भाजपने शर्मा यांना२०१४ मध्ये लोकसभेचं तिकीट दिलं होतं. मंडी लोकसभा मतदारसंघातून त्यांनी काँग्रेसच्या प्रतिभा सिंह यांचा 40 हजार मतांनी पराभव केला. या निवडणुकीत हिमाचलच्या सर्वच्या सर्व चारही जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आले होते. २०१९ मध्ये ही शर्मा यांनी मंडीमधून निवडणूक लढली होती आणि विजयी झाले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या