Tuesday, April 23, 2024
Homeराजकीय'..फक्त रोहित पवारांना मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडायची बाकी आहेत'

‘..फक्त रोहित पवारांना मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडायची बाकी आहेत’

मुंबई | Mumbai

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या एका वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. जयंत पाटील यांनी दिलेल्या एका मुलाखतीत मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या चर्चेवरून भाजपचे आमदार व नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

- Advertisement -

अतुल भातखळकर यांनी जयंत पाटलांच्या त्या वक्तव्याचा आधार घेत म्हंटले आहे की, “आता महा विकास आघाडीत फक्त रोहित पवारांना मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडायची बाकी आहेत.” असा टोला त्यांनी रोहित पवारांना लगावला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या