Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याशरद पवारांच्या 'त्या' वक्तव्यावरून भाजप नेते आक्रमक; म्हणाले,"सुप्रिया सुळेंना हमासकडून लढण्यासाठी पाठवा"

शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून भाजप नेते आक्रमक; म्हणाले,”सुप्रिया सुळेंना हमासकडून लढण्यासाठी पाठवा”

मुंबई | Mumbai

राज्यातील राजकीय वातावरण इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या संघर्षावरुन चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पॅलेस्टाईनबाबत केलेल्या वक्तव्यावरुन भाजपने नेते त्यांच्यावर जोरदार टीका करत आहेत…

- Advertisement -

शरद पवार म्हणाले की, आपण पॅलेस्टाईनच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. ती संपूर्ण जमीन पॅलेस्टाईनची आहे आणि इस्रायलने येऊन त्या जमिनीवर कब्जा केला आहे. त्यांची घरे ताब्यात घेतली. इस्त्रायली तिथे बाहेरचे आहेत आणि प्रत्यक्षात ही जमीन इस्रायलची नाही. या जमिनीच्या मालकीच्या लोकांच्या पाठीशी राष्ट्रवादी उभी आहे. या वक्तव्याचा भाजप नेत्यांकडून निषेध केला जात आहे.

Lalit Patil News : ललित पाटील प्रकरणात दोन महिलांना नाशिकमधून अटक; कोण आहेत या महिला?

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. मला वाटते शरद पवार साहेब सुप्रिया सुळे मॅडम यांना हमासच्या बाजूने लढण्यासाठी गाझाला पाठवतील, असे वक्तव्य त्यांनी केले आहे.

याबाबत नितीन गडकरी यांनी म्हटले आहे की, शरद पवार यांनी केलेल्या बेजबाबदार विधानाचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलमधील नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला होता. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर भारत सातत्याने सर्व प्रकारच्या दहशतवादाच्या विरोधात उभा राहिला आहे. इस्रायलमधील दहशतवादी हल्ल्याचा पंतप्रधान मोदींनी केलेला तीव्र निषेध हे जागतिक शांतता आणि सुरक्षेसाठीच्या आपल्या अटल वचनबद्धतेचे प्रतिबिंब आहे.

IND vs BAN : विश्वचषक स्पर्धेत आज भारत-बांगलादेश भिडणार; कुणाचे पारडे जड?

राष्ट्रहित आणि राष्ट्रीय सुरक्षेला राजकीय विचारांनी कधीही बाधा आणता कामा नये हे शरद पवारांसारख्या ज्येष्ठ राजकीय नेत्यांनी समजून घेणे अत्यावश्यक आहे, असा खोचक सल्ला गडकरींनी पवारांना दिला आहे.

राष्ट्रीय सुरक्षा ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे आणि आपल्या राष्ट्रहिताचे रक्षण करताना एकता आणि सहमती असली पाहिजे. परिस्थितीच्या गंभीरतेमुळे राजकीय संबंध किंवा वैयक्तिक मतांची पर्वा न करता दहशतवादाविरुद्ध एकसंध राहणे आवश्यक असल्याचेही गडकरी यांनी म्हटले आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

ससून ड्रग प्रकरणाची विशेष एसआयटी मार्फत चौकशी करा; विजय वडेट्टीवार यांची मागणी

- Advertisment -

ताज्या बातम्या