Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यापवारसाहेबांचा गेम अजितदादांनी केला

पवारसाहेबांचा गेम अजितदादांनी केला

मुंबई

देवेंद्र फडणवीस यांनी भल्या पहाटे घेतलेल्या शपथविधीवर टीकेला नीलेश राणे यांनी उत्तर दिले आहे. पवारसाहेबांचा गेम कोणी केला असेल तर तो अजितदादा पवारांनीच केला,’ असा टोला नीलेश राणे यांनी मारला आहे.

- Advertisement -

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अधिकाऱ्यांनी महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा प्रयत्न केला असल्याचे म्हटले होते. मात्र यानंतर घुमजाव करत मी असे बोललोच नाही, असे स्पष्टीकरण दिले. यानंतर सामनामधील अग्रलेखात हा विषय मांडला आहे. त्यात भल्या पहाटे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी घेतलेल्या शपथविधीविषयीही भाष्य केले. त्यावरुन आता नितेश राणेंनी टीका केली आहे.

निलेश राणेंनी ट्विट करत म्हटले की, ‘शिवसेना नेहमी भाजप व राष्ट्रवादीच्या पहाटे घेतलेल्या शपथविधीवर टीका करते. परंतु अजितदादा पवार पहाटे पहाटे राज्यपालांच्या बंगल्यावर मॉर्निंग वॉकसाठी आले होते काय? त्यांच्याजवळ आमदार टिकले नाही म्हणून ते परत गेले. पवार साहेबांचा जर कोणी गेम केला असेल तर तो अजितदादानींच केला आहे’ असा दावा नितेश राणेंनी केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या