Friday, April 26, 2024
Homeनगरशिर्डी नगरपंचायतवर भाजपचा झेंडा फडकविणार

शिर्डी नगरपंचायतवर भाजपचा झेंडा फडकविणार

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

राज्य सरकारकडून लोकांना अपेक्षा राहिलेल्या नाहीत. एकीकडे परमिट रूम (Permit room), बार (Bar), मॉल (Mall), लोकल प्रवास (Local travel) अशी गर्दीचे ठिकाणे सुरू आहेत. मात्र शाळा आणि मंदिरे बंद ठेवले आहेत. देव मंदिरात कोंडण्याचे महापाप आघाडी सरकारने केले असून या सरकारचा नाकर्तेपणा जनतेसमोर मांडून आगामी शिर्डी नगरपंचायतच्या निवडणुकीत (Shirdi Nagar Panchayat elections) सतरा विरुद्ध शून्य असा निकाल हाती घेऊन नगरपंचायतीवर भाजपाचा झेंडा (BJP flag on Nagar Panchayat) फडकविणार असल्याची ग्वाही आ. राधाकृष्ण विखे पाटील (MLA Radhakrishna Vikhe Patil) यांनी दिली आहे.

- Advertisement -

भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांचा आगामी शिर्डी नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विजयी संकल्प मेळावा शिर्डी येथे संपन्न झाला. याप्रसंगी आ. राधाकृष्ण विखे पाटील (MLA Radhakrishna Vikhe Patil) बोलत होते. यावेळी उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, नगराध्यक्ष शिवाजीराव गोंदकर, भाजपाचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर गोंदकर, कैलासबापू कोते, नगरसेवक अभय शेळके, सुजित गोंदकर, उपनगराध्यक्ष हरिश्चंद्र कोते, मंगेश त्रिभुवन, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष सचिन तांबे, नगरसेवक जगन्नाथ गोंदकर, अ‍ॅड. अनिल शेजवळ, रवींद्र गोंदकर, नगरसेवक रवींद्र कोते, शिर्डी सोसायटीचे चेअरमन विजयराव कोते व सर्व संचालक, जिल्हा उपाध्यक्ष अशोक पवार, गणेश कारखान्याचे उपाध्यक्ष प्रतापराव जगताप, संचालक मधुकर कोते, भाजपाचे शिर्डी शहराध्यक्ष सचिन शिंदे, रामभाऊ कोते, शामभाऊ कोते, अशोक गायके, प्रमोद गोंदकर, अरविंद कोते, सोमनाथ कावळे, साईराज कोते, विनायक कोते, सुधीर शिंदे, देवानंद शेजवळ, किरण बोराडे, सचिन भैरट, नरेश सुराणा, अजय नागरे आदींसह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

आ. राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, शिर्डीचे अर्थकारण साई मंदिरावर अवलंबून आहे. मंदिर बंद असल्याने अनेकांचा रोजगार गेला. महाराष्ट्रात धार्मिक स्थळे बंद असतांना इतर राज्यातील धार्मिक तीर्थस्थळे सुरू आहे. तिरुपतीचे बालाजी मंदिर भाविकांसाठी सुरू आहे. बालाजीला दर्शनासाठी जाणार्‍या भाविकांना करोना होत नाही, मात्र शिर्डीला येणार्‍यांना भाविकांना त्रास होतो की काय? असा उपरोधिक सवालही त्यांनी केला.

गर्दीची सर्व ठिकाणे सुरू केली आहेत. लोकलने दररोज सुमारे 50 लाख लोक प्रवास करत आहेत. अशा ठिकाणी सरकार परवानगी देते, मात्र मंदिरे बंद ठेवली जातात. शिर्डीतील नोंदणीकृत दुकानदार व्यावसायिक, हातगाडीवाले या सर्वांचा व्यावसायिक कर शासनाने माफ करावा व त्याबदल्यात नगरपंचायत नगरपालिकांना शासनाने अनुदान द्यावे. कर्जाचे हप्ते पाडून मिळावे यासाठी आपण केंद्र सरकारला विनंती करणार आहोत. पंतप्रधानांची भेट घेऊन धार्मिक तीर्थस्थळांवर अर्थकारण अवलंबून असलेल्या राज्यातील सर्वच ठिकाणच्या व्यावसायिकांना व्यवसायिक करातून शंभर टक्के सूट व बँकांच्या कर्जाच्या हप्त्यात दिलासा देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

नगरपंचायत निवडणुकीचे (Nagar Panchayat elections) पडघम वाजू लागले आहेत. वीस वर्षांपूर्वी शिर्डीची (Shirdi) अवस्था बघितली तर आता विकासात्मक दृष्ट्या प्रचंड मोठा कायापालट झालेला आहे. रेल्वे, विमान, बस यासह विविध सुविधा विकासात्मक कामे मार्गी लागली आहेत. पूर्वी वीस हजारांची लोकसंख्या काही वर्षातच झपाट्याने वाढत जाऊन चाळीस हजारावर गेली हे त्याच्या सिद्धतेचे उदाहरण आहे.

यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, नगरपंचायतचे नगराध्यक्ष शिवाजीराव गोंदकर, प्रथम नगराध्यक्ष कैलास कोते, नगरसेवक अभय शेळके आदींनी मनोगत व्यक्त केले. शहराध्यक्ष सचिन शिंदे यांनी तर सूत्रसंचालन नगरसेवक मंगेश त्रिभुवन व निवेदक प्रसन्ना धुमाळ यांनी केले. भाजपचे ज्येेष्ठ नेते किरीट सोमय्या यांना झालेल्या अटकेच्या निषेधार्थ उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दोन्ही हात वर करून निषेध व्यक्त केला.

शिर्डी शहरात विकासात्मक कायापालट झाला आहे. करोनाने संकटात सापडलेल्या व्यापार्‍यांना व्यावसायिक करातून सूट व कर्जाच्या हप्त्यात दिलासा मिळावा यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा. तसेच भविष्यात साई दर्शनासाठी आलेला साईभक्त शिर्डीत थांबला पाहिजे याकरिता शिर्डी येथे आंतरराष्ट्रीय पातळीचा आयटी पार्क उभारावा. शिर्डीत एक-दोन दिवस साईभक्तांना थांबता यावे यासाठी इतर नवनवीन प्रकल्प केंद्राने हाती घ्यावेत यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लवकरच भेट घेऊन त्यांना विनंती करणार असल्याचे आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या