Wednesday, April 24, 2024
Homeनगरदुटप्पी ठाकरे सरकारकडून सूडबुद्धीने शेतकर्‍यांची वीजतोडणी - गोंदकर

दुटप्पी ठाकरे सरकारकडून सूडबुद्धीने शेतकर्‍यांची वीजतोडणी – गोंदकर

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

विज बिल थकबाकी वसुलीसाठी आता राज्यातील महावसुली सरकारने गरीब व मध्यमवर्गीयांच्या खिशावर डल्ला मारण्यास सुरुवात केली असून गरीब वीज ग्राहकांच्या घरात अंधार पसरविण्याचे कारस्थान आखले आहे. बड्या वीज ग्राहकांच्या आणि सरकारी कार्यालयांच्या कोट्यवधी रुपयांच्या थकबाकीकडे दुर्लक्ष (Ignore) करून गरीब कुटुंबांची वीज कापणार्‍या दुटप्पी ठाकरे सरकारने आपला जनताविरोधी चेहरा पुन्हा उघड केला असल्याची टीका भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर (BJP district president Rajendra Gondkar) यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

- Advertisement -

श्री. गोंदकर (BJP district president Rajendra Gondkar) यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, राज्यातील सरकारी कार्यालये, ग्रामपंचायती, पाणीपुरवठा योजना (Water supply scheme), मंत्र्यांचे बंगले, साखर कारखाने, खाजगी फार्म हाऊसमधील वीज बिलांच्या थकबाकीने उच्चांक गाठला असताना त्याकडे दुर्लक्ष करून दुष्काळ, अतिवृष्टी, करोना काळातील टाळेबंदीमुळे अगोदरच कंबरडे मोडलेल्या शेतकरी व गरीब कुटुंबांची ठाकरे सरकारने फसवणूक केली आहे. धनिक थकबाकीदारांसाठी ‘अभय योजना’ राबविणार्‍या आघाडी सरकारने गरीब शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडले, असा आरोपही त्यांनी केला. दुष्काळ, अतिवृष्टी, वादळासारख्या नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी हवालदील झाला आहे. करोना काळातील टाळेबंदीमुळे सामान्य कुटुंबांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.

यासंदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Leader of Opposition Devendra Fadnavis) यांनी मार्च महिन्यात विधीमंडळाच्या अधिवेशनात सरकारला जाब विचारल्यानंतर कृषीपंप आणि घरगुती ग्राहकांच्या वीज तोडणीची कारवाई थांबविण्याचे आश्वासन देण्यात आले. पण अधिवेशनानंतर पुन्हा वीज तोडणीची कारवाई सुरू करून सरकारने सामान्य जनतेचा विश्वासघात केला. फडणवीस सरकारच्या (Fadnavis Government) काळात वीज ग्राहकांच्या समस्या लक्षात घेऊन थकबाकी वसुली थांबविली व वीज मंडळास आर्थिक साह्यदेखील केले. तरीही संपूर्ण कर्जमाफी मिळेपर्यंत वीजबिल भरू नका, असा सल्ला देत शरद पवारांसारखे नेते त्या काळात जनतेस भडकावत होते. आता त्यांच्याच आशीर्वादाने ठाकरे सरकारने (Thackeray government) वसुलीसाठी कारवाई करून लाखो कुटुंबांना वेठीस धरले आहे, अशी टीका श्री. गोंदकर (BJP district president Rajendra Gondkar) यांनी केली. एकीकडे शेतकर्‍यांच्या प्रश्नावरील आंदोलनांना पाठिंबा द्यायचा व दुसरीकडे राज्यातील शेतकर्‍यांची वीज तोडायची हा महावसुली सरकारचा दुटप्पीपणा जनतेने आता ओळखला असून तो त्वरित थांबविला नाही तर जनतेच्या रोषास सामोरे जाण्याची तयारी ठेवा, असा इशाराही (Hint) त्यांनी दिला.

- Advertisment -

ताज्या बातम्या