Saturday, April 27, 2024
Homeनगरश्रीगोंदा : नगरसेवक खेंडकेच्या अपात्रतेला स्थगिती

श्रीगोंदा : नगरसेवक खेंडकेच्या अपात्रतेला स्थगिती

श्रीगोंदा |प्रतिनिधी| Shrigonda

श्रीगोंदा नगरपालिकेची निवडणूक दोन वर्षांपूर्वी झाली. यात बहुमत भाजपचे तर नगराध्यक्ष आघाडीचे निवडुन आले.

- Advertisement -

भाजपचे नगरसेवक अशोक खेंडके हे उपनगराध्यक्ष झाले होते. मात्र त्यांनी पालिकेची परवानगी न घेता बांधकाम केल्याने त्यांना अपात्र ठरवण्यात आले होत. मात्र याबाबत राज्यमंत्री यांनी या अपात्रतेच्या आदेशाला स्थगिती दिली.

श्रीगोंदा नगरपालिकेत भाजपचे ११ आणि काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीचे नऊ नगरसेवक असून नगराध्यक्ष आघाडीचे आहेत. उपनगराध्यक्ष पद भाजपकडे आहे. दोन वर्ष पूर्वी पालिका निवडणूक झाली आहे.

मात्र माजी उपनगराध्यक्ष असलेले आसाराम उर्फ अशोक गुलाब खेंडके यांच्या विरोधात विनापरवाना बांधकाम केले प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आला. खेंडके यांच्या विरोधात जिल्हाधिकारी यांनी नगरसेवक पद अपात्र तेचा निकाल दिला. यानंतर याबाबत मंत्रालयात सुनावणी झाली. या दरम्यान राज्यातील पोटनिवडणूक बाबत मतदार यादी कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता.

मात्र राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या समोर झालेल्या सुनावणीत अशोक खेंडके यांच्या नगरसेवक अपात्रतेला स्थगिती देण्यात आली असल्याचे खेंडके यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या