Thursday, April 25, 2024
Homeजळगावनाशिक येथून भाजप नगरसेविका ज्योती चव्हाण बेपत्ता

नाशिक येथून भाजप नगरसेविका ज्योती चव्हाण बेपत्ता

जळगाव – Jalgaon

भापजचे नगरसेवक शिवसेनेच्या तळाला लागल्याने भाजपकडून नगरसेवकांना नाशिक येथे सहलीसाठी रवाना केले आहे. नाशिक येथील त्र्यंबकेश्‍वर येथून भाजप नगरसेविका ज्योती चव्हाण बेपत्ता झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

- Advertisement -

याप्रकरणी त्यांचे पती बाळासाहेब चव्हाण यांच्या खबरीवरुन रामानंदपोलिसात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.

जळगाव शहर मनपाच्या महापौर व उपमहापौर पदाची निवडणुक उद्या ऑनलाईन सभेत होणार आहे. शिवसेनेकडून भापजचे नगरसेवक तळाला लावले असल्याने मनपात सत्तांतरण हे निश्‍चित मानले जात आहे.

भाजपकडून त्यांच्याकडे असलेले नगरसेवक तळाला लागू नये म्हणून त्यांना नाशिक येथे सहलीसाठी रवाना केले आहे. नाशिक येथे गेलेल्या नगरसेविका ज्योती बाळासाहेब चव्हाण या नाशिक त्र्यंबकेश्‍वर येथून १५ मार्च रोजी दुपारी ४ वाजेनंतर बेपत्ता झाल्या असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकणी आज दुपारी त्यांचे पती बाळासाहेब चव्हाण यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात धाव घेत हरविल्याची तक्रार दाखल केली आहे. पुढील तपास सुशिल चौधरी हे करीत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या