Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याराज्यपाल नियुक्त १२ जागांसाठी भाजप - शिंदे गटातील 'ही' नावे आघाडीवर

राज्यपाल नियुक्त १२ जागांसाठी भाजप – शिंदे गटातील ‘ही’ नावे आघाडीवर

मुंबई | Mumbai

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर राज्यातील राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Government) कोसळल्यानंतर शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्यपाल (Governor) नियुक्त १२ आमदारांसाठी मविआ सरकारने पाठवलेली यादी रद्द करून ती नव्याने पाठवण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या जागांसाठी भाजप आणि शिंदे गटामध्ये जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे…

- Advertisement -

या १२ जागांमधील ८ जागा भाजपला (BJP) तर ४ जागा शिंदे गटाला (Shinde Group) मिळण्याची शक्यता आहे. राज्यपाल नियुक्त १२ जागांसाठी अनेकजण इच्छुक आहेत. यात भाजपच्या वाट्याला ८ जागा येण्याची शक्यता आहे. या आठ जागांसाठी भाजपकडून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) पंकजा मुंडे (Pankaja Munde) चित्रा वाघ (Chitra Wagh) कृपाशंकर सिंह, गणेश हाके, सुधाकर भालेराव यांच्या नावांची चर्चा आहे.

तर दुसरीकडे शिंदे गटाच्या वाट्याला १२ जागांपैकी ४ जागा येण्याची शक्यता आहे. या चार जागांसाठी शिंदे गटातील माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) विजय शिवतारे (Vijay Shivatare) अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) नरेश म्हस्के, चंद्रकांत रघुवंशी, आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul) अभिजित अडसूळ यांची नावे आघाडीवर आहेत.

दरम्यान, आधीच्या महाविकास आघाडी सरकारने पाठवलेली १२ आमदारांची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अखेरपर्यंत मंजूर केली नव्हती. त्यानंतर राज्यात सत्तांतर झाल्यावर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी या १२ जागांसाठी नव्याने यादी पाठवण्याचे निश्चित केले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या