Friday, April 26, 2024
Homeनाशिकमहावितरण कार्यालयावर भाजपकडून आंदोलन; टाळेही ठोकले

महावितरण कार्यालयावर भाजपकडून आंदोलन; टाळेही ठोकले

नाशिकरोड | प्रतिनिधी

वाढीव वीज बिलाच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या वतीने महावितरणच्या मुख्य कार्यालयावर आंदोलन करण्यात आले…

- Advertisement -

यावेळी वीजबिलांची होळी करण्यात आली. विज बिल न भरणाऱ्या ग्राहकांचे कनेक्शन तोडले जाईल. असा इशारा महावितरणने दिला होता.

त्याच्या निषेधार्थ भाजपच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी शहराध्यक्ष गिरीश पालवे, नाशिकरोड अध्यक्ष हेमंत गायकवाड, नगरसेवक संभाजी मोरुस्कर, संगीता गायकवाड, अंबादास पगारे, कोमल मेहरोलिया, बाजीराव भागवत, सचिन हांडगे, राजेश आढाव, जयंत नारद, शांताराम घंटे आधी कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या