Friday, April 26, 2024
Homeधुळेपक्षी सप्ताह विशेष : सातपुडा पर्वतरांगेत सुगरणीचा अधिवास

पक्षी सप्ताह विशेष : सातपुडा पर्वतरांगेत सुगरणीचा अधिवास

बोराडी – Boradi – वार्ताहर :

शिरपूर तालुक्याच्या उत्तरेला सातपुडा पर्वत रांगेतील प्रधानदेवी गावाच्या डोंगरमाथांवरील बाबळीच्या झाडांच्या

- Advertisement -

फांद्यावर असलेल्या सुगरण पक्षांचे खोपे वाटसरुंचे लक्ष वेधुन घेत आहेत. स्थानिकांना सुगरणीने भुरळ घातली आहे.

सुगरणीच्या आपल्या गरटे बांधणीच्या कलेच्या अदाकारीला कवायत्री बहीणाबाई यांनी अप्रतिम काव्यबद्ब केले आहे.

अरे खोप्यामधी खोपा, सुगरणीचा चांगला। देखा पिलासाठी तिने, झोका झाडाले टांगला। पिल निजते खोप्यात, जसा झुलता बंगला। तिचा पिलामधी जीव, जीव झाडाले टांगला.

खोपा म्हणजे सुगरणीचे घरटे. दिसले की, बहीणाबाई चौधरींच्या वरील पंक्ती आठवल्या शिवाय राहत नाहीत. दैनंदिन आयुष्यात सुगरणींचे खोपे सगळ्यांनी ठिकठिकाणी बघितले असतील.

सुगरण पक्षी कसा दिसतो, हे अनेकांना माहीत नसते, पण त्याचे काटेकोर विणलेले घरटे मात्र सगळ्यांच्याच परिचयाचे आहे.

शिरपुर तालुक्याच्या उत्तरेला सातपुडा पर्वत रांगेत अनेक पक्षांची जाती,उपजाती आढळतात. जैवविविधतेने समृध्द असलेल्या हा परीसर पावसाळ्यात बहरुन गेला आहे.

सुगरण पक्ष्यांचे घरटं म्हणजे उत्तम कारागिरीचा नमुना, निर्सगात आपण अनेक चमत्कार बघतो. शत्रु पक्षी वा सापांपासुन सरंक्षण व्हावे यासाठी सुगरण पक्षी काटेरी बाबुळाच्या उंच फांदिवर खोपा तयार करते.

सुगरणीचे घरटे एखाद्या झाडाला किंवा विहिरीत किंवा अन्यत्र टांगलेले असते. सुगरण पक्ष्याच्या घरट़यात खालच्या बाजूने प्रवेशद्वार असते. खालून निमुळते आणि लांब बोगदा असलेले घरटे वर गोलाकार होत जाते.

वरच्या भागात दोन किंवा जास्त कप्पे असतात. हे घरटे गवत, कापूस, केस आणि इतर वस्तूंनी तयार केलेले आणि व्यवस्थित विणलेले असते. घरट़याच्या फुगीर भागात ओल्या मातीचा गिलावा असतो.

मादी एकावेळी 2 ते 4 अंडी देते. ही अंडी शुभ्र पांढर्या रंगाची असतात. अंडी उबविणे, पिलांना खाऊ घालणे वगैरे कामे मादी एकटीच करते. पक्षी सृष्टीतील बहुतेक पक्षी विणीची वेळ आली की घरटी बांधायच्या उद्योगाला लागतात.

- Advertisment -

ताज्या बातम्या