Saturday, April 27, 2024
Homeनाशिकबागलाण तालुक्यात बर्ड फ्ल्यूचा शिरकाव; कोंबड्या मारण्याचे आदेश

बागलाण तालुक्यात बर्ड फ्ल्यूचा शिरकाव; कोंबड्या मारण्याचे आदेश

नाशिक | प्रतिनिधी

गेल्या अनेक दिवसांपासून ज्या आजाराची भीती सर्वत्र व्यक्त केली जात होती तो बर्ड फ्ल्यू अखेर नाशिक जिल्ह्यात आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. तालुक्यातील मौजे वाठोडा येथे मृत कोंबड्यांचा अहवाल आज प्राप्त झाल्यानंतर बर्ड फ्ल्यूचा याठिकाणी शिरकाव झाल्याची माहिती जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिली.

- Advertisement -

मात्र, पाळीव कोंबड्यामध्ये हा आजार दिसून आल्याचे निष्पन्न झाले आहे. याठिकाणी कोणतेही व्यावसायिक पोल्ट्री फार्म नसल्याचे जिल्हाधिकारी मांढरे म्हणाले.

बर्ड फ्ल्यूच्या शिरकावानंतर याठिकाणी प्रतिबंधक उपाय योजना म्हणून वाठोडा शिवारातील बाधित कोंबड्यांचे शास्रोक्त पद्धतीने कलिंग करून विल्हेवाट लावण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

मौजे वाठोडा गट क्रमांक ६२ पासून १ किमी परिसर बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे तर १० किमी परिसर निगराणी क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे.

बाधित क्षेत्रातील सर्व कुक्कुट पक्ष्यांची शीघ्र कृती दलाच्या माध्यमातून खाद्य व अंडी यांचीही शास्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

तसेच परिसरात कुक्कुट शेड निर्जंतुकीकर्ण करून १० किमी त्रिज्येतील परिसरात कुक्कुट पक्ष्यांची खरेदी विक्री, वाहतूक बाजार व जत्रा प्रदर्शन आयोजित करण्यास पुढील तीन महिने प्रतिबंध घालण्यात आले आहेत.

वाठोडा तालुका सटाणा , गावातील घरगुती पाळीव कोंबड्यांमध्ये बर्ड फ्लूची लागण दिसून आले आहे, त्यामुळे एक किलोमीटर परिसर बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेला आहे.. त्या परिसरात कोणतेही व्यावसायिक पोल्ट्रीफार्म नाहीत. त्यामुळे अद्याप घाबरून जाण्याचे कारण नाही. पोल्ट्री संदर्भात योग्य ती काळजी घेण्याच्या सूचना सर्व पोल्ट्री धारकांना देण्यात आलेल्या आहेत.

सूरज मांढरे, जिल्हाधिकारी नाशिक

- Advertisment -

ताज्या बातम्या