Thursday, April 25, 2024
Homeनाशिकमेशी : 'बर्ड फ्लू'ने पोल्ट्री व्यावसायिक धास्तावले!

मेशी : ‘बर्ड फ्लू’ने पोल्ट्री व्यावसायिक धास्तावले!

मेशी l Meshi (वार्ताहर)

मेशी परिसरात शेतीला जोड धंदा म्हणून अनेक तरुणांनी पोल्ट्री व्यवसाय सुरू केला परंतु याआधी करोनाच्या संकटात हा व्यवसाय सापडला त्यातून सावरत नाही तोच आता पुन्हा बर्ड फ्लूने डोके वर काढले आहे.

- Advertisement -

अनेक तरुणांनी कर्ज काढात व्यवसाय पुन्हा सुरू केला. आता पक्षी मोठे आले आहेत तर देशात बर्ड फ्लू सारख्या घटना समोर येताना दिसत आहेत.

यामुळे पोल्ट्री व्यवसायिक धस्तावले आहे. जर पक्षी मारण्याची वेळ आली तर घेतलेले कर्ज फेडायचे कसे असा प्रश्न या व्यवसायिकांना भेडसावत आहे.

आपल्या पक्षांना या फ्लूची लागण होऊ नये म्हणून अनेक व्यवसायिक काळजी घेताना दिसत आहेत पोल्ट्री स्वच्छ ठेवणे, पक्षांना वेळेवर लसीकरण करणे, पक्ष्यांच्या विष्ठेची जागा कोरडी करणे, अशी काळजी घेताना पोल्ट्री व्यवसायिक दिसत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या