Saturday, April 27, 2024
Homeनंदुरबारसहयोग सोशल गृपतर्फे तळोद्यात पक्षी चिकित्सालय

सहयोग सोशल गृपतर्फे तळोद्यात पक्षी चिकित्सालय

मोदलपाडा । वार्ताहर
Modalpada

पक्षी वाचवा पक्षी जगवा या संकल्पनेतून सहयोग सोशल ग्रुप तळोदा यांच्याद्वारे शहरात चायना व नायलॉन मांजा यांचा वापर व विक्री यावर बंदी नियमांचे काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी व घातक मांजाद्वारे जखमी पक्षांवर मोफत उपचार व्हावे यासाठी सहयोग मोफत पक्षी चिकित्सालय सुरू करण्यात आले आहे.

- Advertisement -

मकर संक्रांतीच्या सणानिमित्ताने शहरात अनेक ठिकाणी पतंग उडवले जातात. त्यासाठी काही ठिकाणी चायना अथवा नायलॉनसारख्या घातक मांजाचा वापर केला जातो. सदर मांजामुळे अनेक पक्षी जखमी होतात. तसेच काहीवेळा त्यांचा मृत्यूसुद्धा होतो. तरीही अशा जखमी पक्षांच्या उपचारार्थ सहयोग सोशल ग्रुप द्वारे मोफत पक्षी चिकित्सालय सुरू केले आहे. या चिकित्सालयात पक्षी चिकित्सकाद्वारे पक्षांवर मोफत तपासणी व उपचार केले जाणार आहेत. शहरातील नागरिक व पर्यावरण प्रेमी यांनी लोकमान्य क्लिनिक कॉलेज रोड येथील डॉ.योगेश बडगुजर यांच्याकडे जखमी पक्ष्यांना उपचारासाठी घेऊन यावे असे आवाहन करण्यात आले आहे.

पक्षी वाचवा पक्षी जगवा या अभियानाअंतर्गत पक्षी हे जगले पाहिजे. कारण सृष्टी चक्राच्या नियमांमध्ये ते महत्त्वाची भूमिका बजावतात. आपल्या आनंदासाठी पक्ष्यांना इजा होईल असे कार्य करू नका पतंग उडविण्यासाठी साध्या दोर्‍यांचा वापर करा. असे केल्याने आपला आनंद निश्चितच द्विगुणित होईल. पक्षांना इजा पोहोचेल असे कार्य करू नका. या उपक्रमाचे सर्व प्रशासकीय अधिकार्‍यांमार्फत कौतुक करण्यात येत आहे.

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सहयोग सोशल ग्रुपचे अध्यक्ष अँड.अल्पेश जैन, उपाध्यक्ष डॉ.संदीप जैन, सचिव डॉ.सुनील लोखंडे, कोषाध्यक्ष डॉ.योगेश बडगुजर, डॉ.महेश मोरे, सहसचिव यादव जिरे, रवी चव्हाण, राहुल पाटील, महेंद्र सूर्यवंशी, सोहील मंसुरी, देवेंद्र चव्हाण, राकेश भोई, नितीन पाटील, प्रमोद जहाँगिर आदी परिश्रम घेत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या