Friday, April 26, 2024
Homeजळगावबायोमेट्रिक मशीन उठणार कर्मचार्‍यांच्या जीवावर

बायोमेट्रिक मशीन उठणार कर्मचार्‍यांच्या जीवावर

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात फैलाव झाला होता. आता सद्या करोनाबाधितांची संख्या दिवसागणिक कमी होत असली तरी अजूनही

बायोमेट्रीक हजेरीसाठी एकाच वेळी गर्दी न करता सुरक्षित अंतर ठेवावे. तसेच आता दोन बायोमेट्रीक मशिन लावण्यात आलेले आहेत. प्रत्येकाने हाताचा अंगठा सॅनिटाझर करुन बायोमेट्रीक हजेरी प्रणालीवर ठेवावा. जिल्हा परिषदेच्या सर्वच कर्मचार्‍यांनी स्वत:ची काळजी घेणे गरजेचे आहे.

- Advertisement -

डॉ.बी.एन.पाटील, सीईओ जि.प.जळगाव

संसर्गाचा धोका टळलेला नाही. कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने शासकीय कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी दक्षता घेणे गरजेचे आहे.

कोरोना काळात जिल्हा परिषदेच्या शिक्षण, आरोग्य, बांधकाम, ग्रामपंचायत, समाजकल्याण, ग्रामीण पाणीपुरवठा, सिंचन विभाग यासह सर्व शासकीय कार्यालयांमधील कर्मचार्‍यांना बायोमेट्रीक उपस्थिती प्रणालीचा वापर पुढील आदेश होईपर्यंत स्थगित करण्यात आला आहे.

मात्र, जिल्हा परिषदेने शासनाच्या आदेशालाच ठेंगा दाखवून बायोमेट्रीक उपस्थिती प्रणालीचा वापर सर्रास सुरु आहे.

त्यामुळे कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा धोका बळावण्याची शक्यता वर्तविली जात आहे. बायोमेट्रीक उपस्थिती सक्तीची करण्याऐवजी हजेरी मस्टरवर सही करण्याची पूर्ववत पद्धत सुरु करावी अशी मागणी पुढे आली आहे.

जि.प.ने ओलांडली शंभरी

जिल्हा परिषदेत एका वरिष्ठ अधिकारी, समाजकल्याण सभापती, आरोग्य सभापती, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, समाजकल्याण अधिकारी, आरोग्य विभागाचे प्रमुखांसह बहुतांश दुसर्‍या फळीत काम करणारे अधिकारी यांच्यासह कर्मचारी करोनाग्रस्त झाले होते. सर्वच जण उपराअंती पुन्हा कामावर रुजू झालेले आहेत.

आतापर्यंत जि.प.मध्ये दीडशेच्यावर कर्मचारी कोरोनाबाधित झाले होते. त्यादृष्टीने जिल्हा परिषदेने गांभीर्याने घेणे गरजेचे आहे.

आता जि.प.त बायोमेट्रीक उपस्थितीऐवजी हजेरी मस्टरवर सही करण्याची पूर्ववत पद्धत सुरु करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या