Friday, April 26, 2024
Homeनगरजैविक इंधनावर चालणारा ड्रोन विकसित करावा

जैविक इंधनावर चालणारा ड्रोन विकसित करावा

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

सद्यस्थितीत भारतात शेतीमध्ये फवारणी करण्यासाठी ड्रोनचा वापर होत असून त्यांची किंमत 5 ते 6 लाखापर्यंत आहे. जर फवारणीसाठी वापरण्यात येणार्‍या ड्रोनची निर्मिती भारतात मोठ्या प्रमाणात केली तर त्यांची किंमत 3 ते 4 लाख रुपयापर्यंत येऊ शकते.शेतकर्‍यांना जर शेतीच्या विविध कामासाठी ड्रोनचा वापर अधिक किफायतशीर करावयाचा असेल तर ड्रोनची किंमत दीड लाखापर्यंत कमी करणे आवश्यक आहे.

- Advertisement -

सद्यस्थितीत लिथियम बॅटरीवर चालणार्‍या ड्रोनऐवजी जैविक इंधनावर चालणार्‍या ड्रोनची निर्मिती केली तर ड्रोनची किंमत कमी होऊन त्यांचा अवलंब शेतकर्‍यांना फवारणीसाठी करणे किफायतशीर होईल, असे प्रतिपादन केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीच्या जागतिक बँक अर्थसाहित, भारतीय कृषी अनुसंधान परिषद, राष्ट्रीय कृषी उच्चशिक्षण प्रकल्प, नवी दिल्ली पुरस्कृत हवामान अद्ययावत शेती व जलव्यवस्थापन प्रकल्पाला भेट देऊन विविध प्रयोगशाळांची पहाणी करताना केले.

याप्रसंगी खा.डॉ. सुजय विखे, कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील, डॉ. शरद गडाख उपस्थित होते. डॉ. सुनिल गोरंटीवार, डॉ. मुकुंद शिंदे, डॉ.सुनील कदम यांनी ड्रोनचे प्रात्यक्षिक व विविध प्रयोगशाळेतील शेती उपयोगी विकसित केलेल्या विविध डिजिटल तंत्रज्ञानाची माहिती दिली. या भेटीदरम्यान कास्ट प्रकल्पा अंतर्गत उभारण्यात आलेल्या ड्रोन आणि रोबोटिजएस प्रयोगशाळा, फवारणी ड्रोन प्रात्यक्षिक, आयओटी आधारित मृदा सेन्सर, इत्यादी ठिकाणी भेटी देऊन माहिती घेतली. तसेच या भेटी दरम्यान कास्ट प्रकल्पातील सदस्य, संशोधन सहयोगी व इतर कर्मचारी यांच्याशी चर्चा केली व त्यांना मार्गदर्शन केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या