Wednesday, April 24, 2024
Homeनगरजैव इंधन निर्मिती प्रकल्प शेतकर्‍यांसाठी वरदान ठरावा : ना. गडाख

जैव इंधन निर्मिती प्रकल्प शेतकर्‍यांसाठी वरदान ठरावा : ना. गडाख

नेवासा (तालुका प्रतिनिधी) –

जैविक शेतमालाला भावाची हमी देणारा व प्रदूषण कमी करणारा खडेश्वरी जैवइंधन निर्मिती प्रकल्प शेतकर्‍यांसाठी वरदान ठरावा

- Advertisement -

असे प्रतिपादन राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी केले.

नेवासा तालुक्यातील नजीक चिंचोली येथे एमसीएल अंतर्गत खडेश्वरी कृषी संकल्प शेतकरी उत्पादक कंपनीच्या ‘खडेश्वरी ग्रीन लीफ बायोफ्युल्स प्रा.लि.’ या जैवइंधन (सीएनजी-पीएनजी गॅस) निर्मिती प्रकल्पाचे भूमिपूजन रविवारी सकाळी ना.गडाख यांचे हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. ज्ञानेश्वर कारखान्याचे जेष्ठ संचालक अ‍ॅड. देसाई देशमुख अध्यक्षस्थानी होते.

महंत गणेशानंद महाराज, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष काशीनाथ नवले, प्रदेश सरचिटणीस गणेश गव्हाणे, बाजार समितीचे संचालक डॉ. शिवाजी शिंदे, उद्योजक बाळासाहेब नवले, डॉ. अशोकराव ढगे, अशोक चौधरी, एमसीएलचे कार्तिक रावल, डॉ. बबनराव आदिक, अतुल गोसावी, एमसीएलचे श्यामशंकर उपाध्याय, रणजित दातीर, बाळासाहेब नवले, नानासाहेब नवथर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

ना.गडाख पुढे म्हणाले, छोट्या गावात होऊ घातलेल्या या प्रकल्पाचा सर्वानाच आनंद आहे.एखादा प्रकल्प उभा होत असताना कंपनी, सभासद व शेतकरी यांच्या फायद्याचा विचार होत असतो. या प्रकल्पासाठी हत्तीगवत हा कच्चामाल असल्याने व त्याला उभी भाव देण्याची हमी कंपनी देणार असल्याने शेतकर्‍यांना त्याचा लाभ होईल. त्याचबरोबर सेंद्रिय शेतीमाल उत्पादनासाठी मोफत खते व बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही अधिकार्‍यांनी सांगितले. त्यामुळे शेतकर्‍यांना एका वेगळ्या वळणार घेऊन जाणार प्रकल्प म्हणून आम्ही या प्रकल्पाकडे पाहतो आहे. हा प्रकल्प उभा रहावा हीच सर्वांची एक अपेक्षा आहे. बाबुराव चावरे हे अत्यंत प्रामाणिक, विश्वासू व्यक्ती आहे. बँक अधिकारी म्हणून सेवानिवृत्तीनंतर त्यांनी हाती घेतलेल्या जैवइंधन निर्मिती प्रकल्पाला सर्वांनी सहकार्य करावे. हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी माझ्याकडून जी काही मदत लागेल ती मी करेल. करोनाचे संकट असतानाही नेवासा तालुक्यातील रस्त्यांसाठी 100 कोटींचा निधी मंजूर झाला आहे, महिन्याभरात कामे सुरू होतील. रस्त्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी मिळणारा जिल्ह्यातील नेवासा एकमेव तालुका आहे. करोनामुळे एक वर्ष वाया गेले. वाया गेलेल्या एका वर्षाची भर पुढच्या काळात भरून काढायची आहे, त्यासाठी मी प्रामाणिकपणाने प्रयत्न देखील करणार आहे.

एमसीएलचे अधिकारी कार्तिक रावल म्हणाले, गिन्नी गवतापासून (नेपिअर ग्रास) इंधन निर्मितीचा हा प्रकल्प आहे. देशाचे परकीय चलन वाचविणे व इंधनाच्या बाबतीत भारताला आत्मनिर्भर करणे, शेतकरी हिताचे काम करणे हा या मागचा उद्देश आहे.

गणेशानंद महाराज, अ‍ॅड.देसाई देशमुख, रणजित दातीर,डॉ. अशोकराव ढगे यांनीही मनोगत व्यक्त केले.

यावेळी बाळासाहेब उंडे, भागचंद चावरे, महेश चावरे, मयूर चावरे, बबनराव पवार, शिवाजी चावरे, गणेश चावरे, योगेश चावरे आदीसह ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते. प्रा. रेवणनाथ पवार यांनी सूत्रसंचालन केले. कंपनीचे मुख्य प्रवर्तक बाबुराव चावरे यांनी आभार मानले.

नेवाशात बिगर गॅसचाच स्फोट होत असतो…

15 वर्षांपूर्वी मी जबलपूरला जाऊन एका शेतकर्‍याने शेणापासून बायोगॅस तयार करून तो कॉम्प्रेस करून गॅस किटमध्ये भरून वाहनांना इंधन म्हणून वापरण्याचा केलेल्या प्रयोगाची माहिती घेतली-अभ्यास केला. परंतु स्फोटक प्रदार्थात मोडत असल्याने गॅस निर्मिती करायची म्हणजे अनेक परवानग्या घ्यावा लागतात. त्या न मिळाल्याने तो प्रकल्प पूर्ण होऊ शकला नाही. गॅसचा म्हटले की कधीही स्फोट होऊ शकतो. त्यातल्या त्यात नेवासा बिगर गॅसचाच राजकिय स्फोट होत असतो अशी कोपरखळी राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी विरोधकांना मारल्याने सभेत एकच हशा पिकला.

- Advertisment -

ताज्या बातम्या