Wednesday, April 24, 2024
Homeनगरबिंगो जुगारावर एलसीबीचा छापा

बिंगो जुगारावर एलसीबीचा छापा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

लोकांकडून पैसे घेऊन मोबाईलवर बिंगो जुगार खेळविणार्‍या युवकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले. मंगळवारी (30 मे) सायंकाळी साडे सहा वाजता मंगलगेट परिसरात ही कारवाई केली. प्रथमेश शिरीष थोरात (वय 19 रा. वंजारगल्ली, मंगलगेट) असे त्याचे नाव आहे.

- Advertisement -

पोलीस अंमलदार संदीप पवार यांच्या फिर्यादीवरून थोरात विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडून 10 हजार 230 रुपये रोख रक्कम व 35 हजारांचा मोबाईल असा एकूण 45 हजार 230 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार पवार, संतोष लोढे, संदीप दरंदले, रोहित मिसाळ यांचे पथक तोफखाना पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंद्यावर कारवाई करत असताना त्यांना माहिती मिळाली की, प्रथमेश शिरीष थोरात हा मंगलगेटजवळ, डबरा ग्राहक भंडार येथे पत्र्याच्या शेडमध्ये मोबाईलवर बिंगो जुगार पैसे घेऊन खेळत व खेळवित आहेत.

पोलिसांनी याबाबतची माहिती तोफखाना पोलिसांना कळवून अंमलदार संदीप केरूळकर यांना सोबत घेऊन पंचासमक्ष नमूद ठिकाणी छापा टाकला असता प्रथमेश थोरात बिंगो जुगार खेळवित असल्याचे दिसून आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या