Friday, April 26, 2024
Homeनगरदोन दुचाकीच्या धडकेत एक ठार तर एक जखमी

दोन दुचाकीच्या धडकेत एक ठार तर एक जखमी

तळेगाव दिघे |वार्ताहर| Talegav Dighe

संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे शिवारात दोन दुचाकींची धडक होत अपघात झाला. या अपघातात एक दुचाकीस्वार युवक जागीच ठार झाला, तर एकजण जखमी झाला.

- Advertisement -

लोणी ते नांदूरशिंगोटे रस्त्यावर तळेगाव दिघे शिवारात हॉटेल आराध्या नजीक बुधवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली. तळेगाव दिघे शिवारातील हॉटेल आराध्या नजीक दोन दुचाकींची धडक होत अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार अमोल अशोक दिघे (वय 31 वर्ष, रा. तळेगाव दिघे) हा युवक जागीच ठार झाला. तर दुसरा दुचाकीस्वार अमोल निवृत्ती दिघे हा युवक जखमी झाला.

दरम्यान दोघाही युवकांना संगमनेर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र तत्पूर्वीच अमोल अशोक दिघे या युवकाचा मृत्यू झाला होता. अमोल अशोक दिघे या युवकाच्या अपघाती मृत्यूने तळेगाव दिघे गावावर शोककळा पसरली असून गुरुवारी दुपारी शोकाकुल वातावरणात त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. संगमनेर तालुका पोलीस अपघाताच्या या घटनेचा तपास करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या