Friday, April 26, 2024
Homeनगरनगर शहरातून दुचाकी चोरी करणारी टोळी गजाआड

नगर शहरातून दुचाकी चोरी करणारी टोळी गजाआड

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर शहरातून दुचाकी चोरी करणारी टोळी कोतवाली पोलिसांनी गजाआड केली आहे. कोतवाली व तोफखाना पोलीस ठाणे हद्दीतील चोरी केलेल्या दोन लाख 15 हजार रुपये किमतीच्या सात दुचाकी त्या टोळीकडून हस्तगत करण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

गणेश देविदास नल्ला (वय 24 रा. श्रमीकनगर, पाईपलाइनरोड), आनंद अनिल काळे (वय 25 रा. गणेशनगर, वार्ड नं. 2 ता. राहता), सचिन रावसाहेत चव्हाण (वय 23 रा. पानेगाव ता. घनसांगवी, जि. जालना) अशी अटक केलेल्या टोळीतील चोरट्यांची नावे आहेत. शहरात मोठ्या प्रमाणात दुचाकी चोरीचे प्रमाणे वाढले असल्याने पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी विशेष पथक स्थापन करून शहरातील दुचाकी चोरी करणार्‍या इसमांचा शोध घेणेबाबत आदेश दिल्याने विशेष पथकातील पोलीस अंमलदार शाहीद शेख, रसलीम शेख, प्रमोद लहारे, सुमित गवळी, दीपक रोहोकले यांनी माहिती काढली असता गणेश देविदास नल्ला आयुर्वेदीक कॉर्नर येथे दुचाकी चोरण्यासाठी घेणार असल्याची माहिती मिळाली.

पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा लावून गणेश देविदास नल्ला यास ताब्यात घेतले. त्याचे साथीदार आनंद अनिल काळे व सचिन रावसाहेत चव्हाण यांना अस्तगाव (ता. राहाता) येथे जाऊन सापळा रचून ताब्यात घेतले. तिघांनीही नगर शहरातून दुचाकी चोरी केल्याची कबूली दिली असून त्यांच्याकडून सात दुचाकी हस्तगत केल्या आहेत.

एलसीबीकडून एकास अटक

स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पाईपलाईन रोड, सावेडी व गजानन कॉलनी, एमआयडीसी परिसरातून दुचाकी चोरी करणार्‍या एकाला अटक केली आहे. त्याच्याकडून चार दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.उमेश सुरेश खाटीक (वय 24 रा. शास्त्रीनगर, केडगाव, मुळ रा. पाथरवाला ता. नेवासा) असे त्याचे नाव आहे. त्याचा साथीदार सुदाम विक्रम जाधव (रा. सुलतानपूर, खाटकवाडी, ता. नेवासा) हा पसार झाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या