Friday, April 26, 2024
Homeनाशिकनाशिकरोडला दुचाकी जाळली

नाशिकरोडला दुचाकी जाळली

नाशिकरोड | प्रतिनिधी Nashikroad

येथील जगताप मळा परिसरात असलेल्या एका बंगल्याच्या आवारात पार्किंग केलेली मोपेड दुचाकी एका युवकाने जाळल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला…. (bike burnt by youth at nashikroad area)

- Advertisement -

अधिक माहिती अशी की, प्रकाश नामदेव सांगळे (रा चंद्रमा बंगला जगताप मळा तरण तलाव रोड गोल्डन अकॅडमी समोर नाशिकरोड) यांनी त्यांच्या बंगल्याच्या आवारात पार्क केलेली सुझुकी ॲक्सिस 125 कंपनीची मोपेड गाडी क्रमांक एमएच पंधरा जीबी 93 98 गाडी पार्क केलेली होती.

परिसरात राहणारा राहुल उर्फ सनी श्याम भाटिया (रा. गुलजार गाडी सुभाष रोड नाशिक रोड) याने काहीतरी ज्वलनशील पदार्थ टाकून सदरची गाडी जाळून टाकल्याचा आरोप प्रकाश सांगळे यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत केला आहे.

या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माईनकर (Senior police inspector Nilesh Mainkar) यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक लोंढे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गोडसे व परदेशी हे करत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या