Friday, April 26, 2024
Homeक्रीडापाकिस्तान-इंग्लंड कसोटी मालिकेपूर्वी क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का

पाकिस्तान-इंग्लंड कसोटी मालिकेपूर्वी क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का

मुंबई | Mumbai

इंग्लंड आणि पाकिस्तान (England vs Pakistan) संघांमध्ये उद्या गुरुवारपासून ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेला रावळपिंडी येथे सुरुवात होणार आहे. सामन्याचे थेट प्रक्षेपण सोनी सिक्स आणि सोनी टेन वाहिनीवर सकाळी १०:३० वाजता करण्यात येणार आहे. मात्र कसोटी मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी क्रिकेट चाहत्यांसाठी चिंताजनक बातमी समोर आली आहे…

- Advertisement -

इंग्लंड क्रिकेट संघातील १४ खेळाडूंना अज्ञात व्हायरसची लागण झाली आहे. हा व्हायरस करोना नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सर्व क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

इंग्लंड संघ व्यवस्थापनाने १५ खेळाडूंचा कसोटी संघ पाकिस्तान दौऱ्यावर पाठवला होता. त्यापैकी निम्म्या खेळाडूंना अज्ञात व्हायरसची लागण झाली आहे. त्यामध्ये इंग्लंड कसोटी संघाचा कर्णधार बेन स्ट्रोक्सचा समावेश आहे. सध्या या सर्व खेळाडूंना विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

तसेच त्यांच्यावर तज्ञ डॉक्टर लक्ष ठेऊन आहेत कसोटी मालिकेला एक दिवस शिल्लक असताना ही चिंताजनक बातमी समोर आली आहे. इंग्लंड संघातील खेळाडूंना कोणत्या विषाणूचा संसर्ग झाला आहे. हे अद्याप समजू शकलेले नाही. दरम्यान रावळपिंडी येथील सामना रद्द होणार का? असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांमध्ये सध्या जोर धरू पाहत आहेत.

सलिल परांजपे, नाशिक.

- Advertisment -

ताज्या बातम्या