खंडपीठाकडून आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर

jalgaon-digital
1 Min Read

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

येथील तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या बिग मी इंडिया कंपनीच्या फसवणूकीच्या गुन्ह्यातील संचालक आरोपी सोनिया सोमनाथ राऊत हिचा अटकपूर्व जामीन अर्ज औरंगाबाद खंडपीठाने नामंजूर केला आहे.

बिग मी इंडिया कंपनीच्या संचालक मंडळाविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करत आहेत. अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयाने या गुन्ह्यातील सहा आरोपींचे अटकपूर्व जामीन अर्ज यापूर्वी नामंजूर केले होते. यातील संचालक आरोपी सोनिया राऊत हिने औरंगाबाद खंडपीठात अटकपूर्व अर्ज दाखल केला होता, तो अर्ज नामंजूर करण्यात आला आहे.

दरम्यान फिर्यादी सतीश बाबुराव खोडवे, उदय दिनकर जोशीलकर यांनी तपास अधिकारी पोलीस उपअधीक्षक संजय नाईक पाटील यांची भेट घेऊन या गुन्हातील तपासातील महत्वाच्या 40 मुद्यांचे निवेदन दिले आहे. आरोपींच्या विरोधात योग्य ती कारवाई व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *