Wednesday, April 24, 2024
Homeदेश विदेशBig Bazaar हा रिटेल ब्रँड आता रिलायन्सच्या मालकीचा

Big Bazaar हा रिटेल ब्रँड आता रिलायन्सच्या मालकीचा

मुंबई | Mumbai

Reliance चा स्वतःचा रिलायन्स रिटेल हा मोठा व्यवसाय आहे. यात रिलायन्स फ्रेश, रिलायन्स स्मार्ट, रिलायन्स एलवायएफ, रिलायन्स ज्वेल्स, रिलायन्स ट्रेंड्स, रिलायन्स फूटप्रिंट, रिलायन्स लिव्हिंग, रिलायन्स मार्केट, रिलायन्स मार्केट होलसेल, अजिओ, हॅमलेझ, जिओ मार्ट आणि कन्नन डिपार्टमेंटल स्टोअर एवढे मोठे ब्रँड सामावले आहेत. यातील काही ब्रँडचा व्यवसाय तेजीत आहे. त्यातच

- Advertisement -

मुकेश अंबानी (mukesh ambani) यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज (reliance industries) समुहाने फ्युचर ग्रुपचा (future group) घाऊक आणि रिटेल व्यवसाय २४ हजार ७१३ कोटी रुपयांना खरेदी केला आहे. फ्युचर ग्रुपच्या फ्युचर रिटेल (future retail) आणि फ्युचर लाइफस्टाइल फॅशन (future lifestyle fashion) या कंपन्या रिलायन्समध्ये विलीन झाल्यामुळे बिग बझार हा रिटेल ब्रँड आता रिलायन्सच्या मालकीचा झाला. रिलायन्स आणि फ्युचर ग्रुप यांच्यातील करारामुळे रिटेल क्षेत्रातील मोठा व्यवसाय मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स समुहाच्या ताब्यात आला आहे.

रिलायन्सला फ्युचर ग्रुपसोबतच्या व्हेंचरमुळे एकाचवेळी ऑनलाइन आणि ऑफलाइन क्षेत्रात होलसेल आणि रिटेल व्यवसायाचा विस्तार करणे शक्य होणार आहे. बिग बझार, एफबीबी, फूडहॉल, इझी डे, नीलगिरी, सेंट्रल आणि ब्रँड फॅक्टरी हे ब्रँड आता रिलायन्स रिटेल व्हेंचरचा भाग होणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या