Thursday, April 25, 2024
HomeनाशिकCCTV : अंगावर काटा आणणारा अपघात; दुचाकीस्वार महिलेस फरफटत नेले

CCTV : अंगावर काटा आणणारा अपघात; दुचाकीस्वार महिलेस फरफटत नेले

नाशिक | प्रतिनिधी Nashik

रस्ते अपघातांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. (Accident in Nashik) कालच्या (दि १६) नाशिकमधील दत्त मंदिर चौकातील अपघाताची घटना ताजी असताना आज आणखी एक अपघातातील भीषण घटना समोर आली आहे…. (big accident in satana city)

- Advertisement -

सटाणा शहरातील मालेगाव रोडवर हा अपघात झाला असून भरधाव कार अनियंत्रित झाल्याने कारने दुचाकीला धडक दिली. तसेच विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुसऱ्या कारचेदेखील नुकसान केले. एवढेच नाही तर अपघात घडल्यानंतर दुचाकीवरुन खाली कोसळलेल्या दाम्पत्याला या कार चालकाने दूरपर्यंत फरफटत देखील नेले. या अपघातील दुचाकीवर स्वार असलेल्या महिलेचा मृत्यू झाल्याचे समजते.

ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत (accident cctv footage) कैद झाली असून व्हिडीओ पाहिल्यानंतर अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाहीत. अपघात घडल्यानंतर तात्काळ आजूबाजूच्या नागरिकांनी अपघातातील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, काही वेळाने सटाणा पोलिसांचा (Satana Police) ताफा घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी कारचालकाला ताब्यात घेतले.

- Advertisment -

ताज्या बातम्या