Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकनिसर्गसौंदर्याची अनुभूती; नाशिककरांची 'सायकलला' पसंती

निसर्गसौंदर्याची अनुभूती; नाशिककरांची ‘सायकलला’ पसंती

नाशिक । प्रतिनिधी

करोना संकटाचा आँँटोमोबाईल क्षेत्र लाॅकडाऊन झाले असले तरी सायकल इंड्रस्टी मात्र जोमात आहे. मागील चार महिन्यात देशभरात सायकलचा खप वाढला आहे. नाशिकरही सायकलला पसंती देत आहे.

- Advertisement -

पुर्वी दोन हजार सायकल्स महिन्याला विकल्या जायच्या. आता मागणी वाढली असून महिन्याला सहा हजारांहून अधिक सायकल्स विकल्या जात आहे. त्यातही स्पोर्टस सायकलीला नाशिककरांची पसंती मिळत आहे. अगदी ३० हजारांपासून ते दहा लाखांपर्यतच्या सायकलींची किमंत अाहे.

नाशिकमध्ये सायकल कल्चर दिवसेंदिवस रुळत आहे. सायकल इंडस्ट्रिने कात टाकली असुन भारतीयसह इंटरनॅशनल ब्रॅण्ड असलेल्या सायकल्स नाशिकमध्ये सहज उपलब्ध होत आहे. मागील लाॅकडाऊन काळात तर शहरात सायकलींना प्रचंड मागणी वाढल्याचे दुकानदार सांगतात. चीन वरील बहिष्कार मोहिम सायकल इंड्रस्टिमध्येही पहायला मिळत आहे.

हिरो, हरक्युलस व अँँटलास या भारतीय कंपन्यांच्या सायकलीचा खप वाढला आहे. तसेच तैवानचा ब्रॅण्ड असलेल्या जायंट व मेरीडा या या स्पोर्टस् सायकलिंना नाशिककरांची पसंती मिळत आहे. तीस हजारांपासून ते दहा लाख या सायकलिंची किंमत आहे.

आँँल्मिपिकमध्ये या सायकलिंचा वापर केला जातो. करोना संकटामुळे तैवानमध्ये सायकलचे प्रोडक्शन कमी होत आहे. त्यामुळे सायकलला मागणी जादा पण पुरवठा कमी अशी परिस्थिती पहायला मिळत आहे. इतर ब्रॅण्डच्या सायकलिंना मागणीत मोठी वाढ झाली आहे. महिन्याला नाशिकमध्ये सहा हजार इतक्या सायकल विकल्या जात आहे.

व्यायाम व फिटनेस, पर्यावरण हित, पेट्रोलची बचत व प्रदुषण टळते यामुळे सायकलला मागणी वाढत आहे. मागील काही दिवसांपासुन क्लब, पार्क, जिम व इतर गोष्टी बंद आहे. त्यामुळे सायकलिंगकडे नाशिककरांचा कल वाढत आहे.

तैवानच्या स्पोर्टस् सायकल्स जायंट व मेरिडाला जादा मागणी आहे. लाॅकडाऊनमुळे सायकलला मागणी वाढली आहे. फिटनेससाठी सायकल बेस्ट असुन पार्किंगसाठी जागापण लागत नाही. सर्वच सायकलिंचा खप वाढला आहे.

– किशोर काळे, शिवशक्ती सायकल्स

- Advertisment -

ताज्या बातम्या