Friday, April 26, 2024
Homeजळगावभुसावळ : रिक्षा चालक मालकांचा प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा

भुसावळ : रिक्षा चालक मालकांचा प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा

भुसावळ –

आर.टी.ओ.च्या त्रासाला कंटाळून भुसावळ तालुक्यातील रिक्षा चालक मालकांनी पी.आर.पी.चे प्रदेश महामंत्री जगन सोनवणे यांचा नेतृत्वाखाली स्कुल व्हॅन, स्कुल रिक्षा बंदचा साप्ताहिक महामोर्चा 7 डिसेंबर रोजी भिमालया वरून काढण्यात आला.

- Advertisement -

या मोर्चामध्ये शेकडोच्या संख्येने रिक्षा चालक मालक उपस्थित होते.

भुसावळ तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना वाहून नेणाऱ्या रिक्षा चालकांना मुलांना वाहतूक परमिट घेतल्याशिवाय विद्यार्थ्यांची वाहतूक करता येणार नाही.

शाळेचे पत्र तसेच शासकीय परवानगी घेणे गरजेचे आहे. ज्या रिक्षा चालकांकडे परमिट असूनही परवानगी नसल्यास त्यांना रिक्षेने विदयार्थ्यांना नेता येणार नाही. शाळेकडून परवानगी घेण्यासाठी प्रत्येक विद्यार्थाचे 100 रुपये मोजावे लागणार आहे तर आर.टी.ओ.कार्यालयाकडून परवानगी घेतल्यास 395 रुपये मोजावे लागणार आहे.

तसेच रिक्षा चालकांना नवीन रिक्षा खरेदी करावी लागणार आहे. ह्या सर्व त्रासाला कंटाळून साप्ताहिक महामोर्च्या जुन्या नगरपालिकेवरून प्रांत कार्यलयावर काढण्यात आला. यामध्ये प्रमुख मागण्या आर.टि.ओ.मेमो देणे बंद करा. वाहनांची कागदपत्र तसेच चाबी घेणे बंद करा.मुंडन मोर्चा, हॉर्न वाजवा मोर्चा, रेल्वे रोखी मोर्चा, गांधी पुतळ्या जवळ जेल भरो आंदोलनलाल लाल पागोटी गुलाबी शेंडा आर.टी.ओ.मेला त्याच्या मयतीवर चला असे गाणे गाऊन शासनाला इशारा देण्यात आला. तसेच प्रांत अधिकाऱ्यांना पाच जणांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या