Thursday, April 25, 2024
Homeजळगावभुसावळ माल धक्क्यावरुन बांगलादेशाच्या सीमेवर रॅक रवाना

भुसावळ माल धक्क्यावरुन बांगलादेशाच्या सीमेवर रॅक रवाना

भुसावळ – Bhusawal – आशिष पाटील :

येथील रेल्वेच्या मालधक्क्यावरुन बांगलादेच्या दिशेने रॅक रवाना होण्यासाठीचे नियोजन पूर्वी पासूनच सुरु होते.

- Advertisement -

मात्र अद्याप मक्याचा रॅक रवाना झाला नसला तरी कापसाच्या गठाणींचा बीसीएन 21 वॅगन्सचा रॅक बांगलादेशाच्या सीमेवरील बनगाव येथे रवाना करण्यात आला असल्याची माहिती सुत्रांनी दिली. तब्बल 13 महिन्यांनंतर पहिला रॅक रवाना झाल्याने हमालांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

अहमदाबाद येथील सिटीएल लॉजिस्टिक कंपनीच्या वतीने राज्यातील हिंगोली, अकोला, मलाकापूर, मुक्ताईनगर परिसरातील कापसाच्या गठाणी या रॅकमधून दि. 5 रोजी रात्री रवाना करण्यात आल्या.

यापूर्वी याच मालधक्क्यावरुन दि. 4, 17 व 21 डिसेंबर 2019 या काळात मक्याचे तीन रॅक रुद्रपुर येथे रवना करण्यात आले होते. त्यानंतर तब्बल 13 महिन्यांनतर पुन्हा रॅक रवाना झाला आहे.

दरम्यान, बांगलादेशात मक्याची मोठ्या प्रमाणात मागणी वाढल्यामुळे येथील मालधक्क्यावरुन तीन रॅकचे नियोजन दीपावळी पूर्वी करण्यात आले होते. मात्र आवश्यक मका उपलब्ध न झाल्यामुळे तो रॅक अद्यापही रवाना होऊ शकला नसला तरी बांगलादेशाच्या सीमेवरील बनगाव रेल्वे स्थानकारील मालधक्क्यावर पहिला रॅक रवान करण्यात आला आहे.

रेेल्वेने प्रशासनाने आपले उत्पन्न वाढविण्यासाठी व्यवसाय विकास समितीच्या माध्यमातून रॅक भरण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

तेरा महिन्यात पहिला रॅक

गेेल्या तेरा महिन्यांपासून येथील मालधक्क्यावरुन एकही रॅक रवाना झाला नसल्यामुळे मालधक्क्यावर हमाली करुन करुन पोट हमालांवर उपासमारीची वेळ आली होती.

दरम्यान 5 रोजी रवाना करण्यात आलेल्या रॅकमुळे या मालधक्क्यावर रेल ठेका मजदूर युनियनतर्फे शहरातील 100 व सावदा येथील 100 अशा 200 हजालांना रोजगार उपलब्ध करण्यात आला आहे.

या मजुरांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी युनियनचे अध्यक्ष शे. सत्तार गवळी, उपाध्यक्ष इकबाल गवळी, सचिव बाबू गवळी, कालू गवळी हे प्रयत्न करित आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या