Sunday, April 28, 2024
Homeजळगावचोरीतील वाहने जप्त

चोरीतील वाहने जप्त

भुसावळ – Bhusaval – प्रतिनिधी :

औरंगाबाद जिल्ह्यातून अज्ञात चोरट्यांनी तीन मोटरसायकलींची चोरी केल्या होत्या.

- Advertisement -

ही वाहने पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथून एलसीबीच्या पथाकाने ताब्यात घेतली असून चोरट्यांचा शोध सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात चोरट्यांनी, औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद पोलिसातील गुरनं. 345/2020 भादंवि 379 तसेच गु.र.नं. 366/2020 भादंवि.379 मधील दोन शाईन मोटारसायकल व 1 बुलेट व सिल्लोड ग्रामीण पोस्टे मध्ये दाखल गु.र .नं.296/2020 भादंवि 379 मधील 1 युनिकॉन मोटरसायकल अशी चार वाहने वरखेडी ता. पाचोरा येथे असल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे दि. 28 रोजी एलसीबीचे पो. नि. किरण कुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.फौ.अशोक महाजन, हे. काँ. शरीफ काझी, पो.ना. युनूस शेख, पो. ना. किशोर राठोड, पो.काँ. विनोद पाटील, पो.काँ.रणजीत जाधव यांनी केली. सदरची हस्तगत केलेलू वाहने पुढील कार्यवाहीसाठी खुलदाबाद पो. स्टे. (जि.)औरंगाबाद यांचेकडे हजर केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या