Thursday, April 25, 2024
Homeजळगावआयुध निर्माणी कामगारांचा संप अटळ

आयुध निर्माणी कामगारांचा संप अटळ

भुसावळ – Bhusawal – प्रतिनिधी :

येथिल आयुध निर्माणीसह देशातील ४१ आयुध निर्माणी व संरक्षण क्षेत्रातील अन्य संस्थांचे कर्मचारी दि. १२ ऑक्टोबरपासुन आयुध निर्माणींच निगमिकरण रद्द करण्याच्या मागणीसाठी कर्मचारी संपावर जाणार आहेत.

- Advertisement -

गेल्या वर्षी ६ दिवस चाललेल्या संपानंतर सरकार व कर्मचारी पक्षांमध्ये झालेल्या संयुक्त बैठकीत मागील ४ संरक्षण मंत्र्यांनी दिलेल्या लिखित आश्वासना चे आधारावर निगमिकरण निर्णय रद्द करण्याचा प्रस्ताव कामगार फेडरेशन द्वारे देण्यात आला.

त्यावर संरक्षण सचिवांनी लिखित आश्वासन दिले होते,कि संरक्षण उत्पादन विभागात आयुध निर्माणींचे निगमिकरण करण्याचा कोणताही इरादा सरकारचा नाही व संप मागे घेण्यात आला.

परंतु सरकारद्वारा कोविड-१९ च्या विषम परिस्थितित आत्मनिर्भर भारत चे नावाखाली देशातील संरक्षण क्षेत्रात विभिन्न शस्त्र-अस्र पुरविणा-या आयुध निर्माणींचा निगमिकरण करण्याचा निर्णय घेतला हा आयुध निर्माणी कर्मचाऱ्यांचा घात असुन फॅक्टरी अधिनियम कायद्याचे उल्लंघन आहे.

त्याच आधारावर आज संरक्षण सचिवांना संरक्षणच्या तिन्ही फेडरेशनच्या आदेशानुसार देशातील ४१ आयुध निर्माणींच्या महाप्रबंधकांना निवेदन देण्याचे निर्देश होते त्या नुसार आज भुसावळ आयुध निर्माणीत तिन्ही संलग्न युनियन द्वारे महाप्रबंधकांना निवेदन दिले.

दि.३० रोजी आज सर्व कर्मचारी सकाळी चहा अवकाशात एकत्र येवुन – सोशल डिस्टनसिंग चे पालन करीत प्रशासन भवनावर गेले तेथे प्रचंड घोषणाबाजी करीत कामगार युनियन (एआईडिईएफ), मजदुर युनियन इंटक (आयएनडिडब्लुएफ), आ. नि. कर्मचारी संघ (बीपीएमएस) चे अध्यक्ष व महासचिव यांनी संरक्षण सचिव -संरक्षण उत्पादन अनुभाग यांना महाप्रबंधक यांचे मार्फत निवेदन सोपविले.

महाप्रबंधक यांच्या वतीने संयुक्त महाप्रबंधक निलाद्रि विश्वास, विभागिय महाप्रबंधक बी देविचंद, श्रम कल्याण आयुक्त व कार्यप्रबंधक अंकित धुरकुरे, कनिष्ठ कार्यप्रबंधक मिराज अंजुम यांनी निवेदन स्विकारले. या प्रसंगी सतिश शिंदे, किशोर चौधरी, नवल भिडे, राजकिरण निकम, दिनेश राजगिरे यांनी मनोगत व्यक्त केले, लक्ष्मण वाघ यांनी सुत्र संचालन केले व एम एस राऊत यांनी आभार मानले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी किशोर बढे, प्रविण मोरे, कैलास राजपुत, अनिल सोनवणे, वसिम खान, चेतन चौधरी, हरिष इंगळे, महेंद्र वानखेडे, विजय साळुंखे, सूर्यभान गाढे यांचेसह संघर्ष समिति पदाधिका-यांनी मेहनत घेतली स्थानिक संयुक्त संघर्ष समिति द्वारे दि. १२ ऑक्टोबर पासुन सूरू होणाऱ्या देशव्यापी अनिश्चित कालिन संपावर जाणेसाठी दृढ निश्चय घरूनच न निघण्याचे आवाहन मेंबर जेसिएम ३,आयुध निर्माणी बोर्ड कोलकाता सदस्य दिनेश राजगिरे यांनी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या