Wednesday, April 24, 2024
Homeराजकीयपालिकेची सर्वसाधारण सभा रद्द करा

पालिकेची सर्वसाधारण सभा रद्द करा

भुसावळ – प्रतिनिधी – bhusaval :

येथील पालिकेच्या २८ व्या सर्वसाधारण सभेचे आयोजन दि. २७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजत व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे करण्यात येणार आहे.

- Advertisement -

या बाबतचा अजेंडा नगरसेवकांना देण्यात आला आहे. मात्र या सभेवर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने मुख्याधिकारी यांना निवेदन सादर करुन सदरची सभा बेकायदेशीर व नियमबाह्य असल्याचे कळविले आहे.

सभेच्या अजेंड्यातील काही विषयांवर विरोधी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने हरकती घेण्यात आल्या आहेत. त्यात प्रामुख्याने विरोधी सदस्यांनी प्रस्तावित केलेले विषय दुर्भावनेने अजेंड्यात घेण्यात आलेले नाही.

सभा जाणूनबुजुन व्हिडीओ कॉन्फरसिंग द्वारे ठेवण्यात आली आहे. मात्र विरोधी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांमध्ये व्हिडीओ कॉन्फरंसिंगचे अज्ञान आहे. तसेच सध्या शासनाने विवाह समारंभात जाण्याची परवाणगी दिली असतानाही सभा व्हिडीओ कॉन्फरंसिंग द्वारे का ? ती रद्द करण्यात यावी.

कोणत्याही नगरसेवकाने न मांडलेले विषय सभेत घेण्यात आले आहे.ठेकेदाराचे हित यात पाहण्यत आल्याचा आरोप करण्यात आला आहे. तरी सभेवरील हरतकतीचा विचार करुन ती रद्द करण्याता यावी अशी विनंती करण्यात आली आहे.

दरम्यान, पालिकेच्या वतीनग प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात शासनाच्या ३ जुलै २०२० अन्वये महानगरपालिका व पालिकांच्या सभा व विषय समित्यांच्या सभा व्हीडीओ कॉन्फरंसिंग द्वारे घेण्याबाबत सुचना असल्यामुळे सामाजिक अंतर पाळण्यासाठी २७ नोव्हेंबर रोेजीची सकाळी ११ वाजताची सर्वसाधारण सभेचे कामकाज व्हिडीओ कॉन्फरंसिंगद्वारे होणार असल्याचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांनी कळविले आहेे.

- Advertisment -

ताज्या बातम्या