Tuesday, April 23, 2024
Homeजळगावभुसावळातील गुन्हेगारीसोबत नाकर्त्यांनाही हद्दपार करा : ना.गुलाबराव पाटील

भुसावळातील गुन्हेगारीसोबत नाकर्त्यांनाही हद्दपार करा : ना.गुलाबराव पाटील

भुसावळ – प्रतिनिधी Bhusaval

भुसावळातील गुन्हेगारी ही (police) पोलीस प्रशासनाच्या तत्परतेने आता थोडी कमी झालेली आहे. ज्या प्रकारे गुन्हेगारांना हद्दपार करण्यात येते, अगदी त्याच प्रमाणे नाकर्त्या लोकप्रतिनिधींनाही जनता (Public) हद्दपार केल्याशिवाय राहत नाही असे प्रतिपादन पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील (Guardian Minister Gulabrao Patil) यांनी केले

- Advertisement -

जिल्हा नियोजन मंडळाच्या (District Planning Board) निधीतून प्रदान करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांचे उदघाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते झाल्यानंतर बोलतांना ना.पाटील यांनी आपण विकासकामांमध्ये कोणतेही राजकारण अथवा भेदभाव करत नसून भुसावळच्या विकासासाठी आपण भरीव निधी प्रदान केल्याचे आवर्जून नमूद केले.

शहरातील विविध कामांसाठी तब्बल ५८ कोटी रूपये मिळाले असून लवकरच भुसावळसह जिल्ह्याला (cctv) सीसीटिव्हींसाठी ११ कोटी रूपयांचा निधी मिळणार असल्याची घोषणा देखील पाकलमंत्र्यांनी केली.

आज भुसावळ शहरातील विविध विकासकामांचे भूमीपुजन पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून (MLA Sanjay Saavkare) आमदार संजय सावकारे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख समाधान महाजन, प्रांताधिकारी तथा न.पा.प्रशासक रामसिंग सुलाणे (Ramsingh Sulane), डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे (DYSP Somnath Waghchaure), बाजारपेठ पोलीस स्थानकाचे निरिक्षक गायकवाड, मुख्याधिकारी संदीप चिद्रवार, माजी नगराध्यक्ष रमण भोळे व सर्व पक्षीय माजी नगरसेवक आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या