चिंचाटी विद्युत उपकेंद्राचा आज भूमिपूजन सोहळा

jalgaon-digital
2 Min Read

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत (State Energy Minister Dr. Nitin Raut) हे उद्या दि.13 रोजी जिल्हा दौर्‍यावर येत असून सकाळी 10.30 वाजता रावेर (Raver) तालुक्यातील चिंचाटी (Chinchat) येथील 33 केव्ही विद्युत उपकेंद्राचे (Power Substation) भूमिपूजन (Bhumipujan ceremony) त्यांच्या हस्ते होणार आहे.

शहाद्याच्या सुपूत्राने केले ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ चित्रपटाचे सहाय्यक दिग्दर्शन

या कार्यक्रमाचे अध्यक्ष पालकमंत्री गुलाबराव पाटील (Guardian Minister Gulabrao Patil) हे राहणार आहेत. ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची विशेष उपस्थिती तर खा. रक्षा खडसे, खा.उन्मेश पाटील, आ.डॉ.सुधीर तांबे, आ.चंदुलाल पटेल, आ.किशोर दराडे, आ.शिरीशदादा चौधरी, आ.चिमणराव पाटील, आ.गिरीश महाजन, आ.राजुमामा भोळे, आ.संजय सावकारे, आ.अनिल पाटील, आ.किशोर पाटील, आ.चंद्रकांत पाटील, आ.लताताई सोनवणे, आ.मंगेश चव्हाण आणि महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

सकाळी 11 वाजता मोर धरणावरील नियोजित सौर ऊर्जा (Solar energy) स्थळाची पाहणी करून दुपारी 2 वाजता भुसावळ येथील औष्णिक विद्युत केंद्रात (Thermal Power Station at Bhusawal) महावितरण, महानिर्मिती व महापारेषण कंपन्यांच्या कामकाजाचा आढावा ऊर्जामंत्री डॉ.राऊत घेणार आहेत. नियोजित उपकेंद्रामुळे चिंचाटी भागातील ग्राहकांना आणखी योग्य दाबाने व अखंडित वीजपुरवठा (Uninterrupted power supply) मिळणार असून रावेर तालुक्यामध्ये भविष्यात येणारी विजेची मागणी पूर्ण करण्यास मदत होणार आहे.

तरी भूमिपूजन कार्यक्रमाला या भागातील बहुसंख्य नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन महावितरणच्या जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता कैलास हुमणे, जळगाव मंडलाचे अधीक्षक अभियंता फारुख शेख, सावदा विभागाचे कार्यकारी अभियंता गोरक्षनाथ सपकाळे, स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता अनिरुद्ध नाईकवाडे यांनी केले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *