Thursday, April 25, 2024
Homeनाशिकलॉजिस्टिक पार्कमुळे नाशिकचा विकास जलदगतीने : पाटील

लॉजिस्टिक पार्कमुळे नाशिकचा विकास जलदगतीने : पाटील

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

लॉजिस्टिक पार्कमुळे (Logistic Park) नाशिकचा जलदगतीने विकास होणार आहे. तसेच हजारो लोकांच्या हाताला रोजगारदेखील उपलब्ध होईल, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री कपिल पाटील (Kapil Patil) यांनी केले…

- Advertisement -

नाशिक महापालिकेच्या (Nashik NMC) वतीने आडगाव ट्रक टर्मिनल (Adgaon Truck Terminal) येथे सुमारे 57 एकरमध्ये केंद्र सरकारच्या (Central Government) सहकार्याने लॉजिस्टिक पार्क भूमिपूजन सोहळा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.

काय आहे लॉजिस्टिक पार्क?

लॉजिस्टिक पार्कची प्रामुख्याने औद्योगिक वसाहतीमध्ये गरज असते. कंपन्यांची उत्पादने ठेवण्यासाठी या पार्कचा उपयोग होतो. पार्कमध्ये फ्रेट स्टेशन, साठवणूक, वितरण, उत्पादनांचे ग्रेडिंग, कार्गो अशा सुविधा मिळतात.

लॉजिस्टिक हबमध्ये ट्रक टर्मिनल्स, कूलिंग, प्लॅन्ट, वर्कशॉप, होलसेल मॉल चेन तयार केली जाईल. त्यामुळे शहरात होणारी वाहतूक आपसूक कमी होईल. त्यामुळे शहरांचे प्रदूषणही कमी होण्यास मदत मिळणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या