Saturday, April 27, 2024
Homeनगरभुजबळ यांच्यावरील कारवाईने शहर काँग्रेस कार्यकर्ते संतप्त

भुजबळ यांच्यावरील कारवाईने शहर काँग्रेस कार्यकर्ते संतप्त

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहर ब्लॉक काँग्रेसच्या अध्यक्ष पदावरून बाळासाहेब भुजबळ यांना हटवल्याबद्दल शहर काँग्रेस कार्यकर्त्यांत संतप्त प्रतिक्रिया शनिवारी झालेल्या बैठकीत उमटल्या.

- Advertisement -

या निर्णयाविरोधात पक्ष श्रेष्ठींकडे दाद मागण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

यावेळी शहर उपाध्यक्ष शशिकांत पवार, चिटणीस मुकुंद लखापती, आर. आर. पाटील, रजनी ताठे, माजी नगरसेवक रुपसिंग कदम, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सविता मोरे, सुभाष रणदिवे, अज्जू शेख, अभिजित कांबळे, प्रदेश सदस्य शामराव वाघस्कर, पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश सरचिटणीस फिरोज शफी खान, माजी नगरसेवक फैयाज शेख, बाळासाहेब पवार, निखिल वारे, जिल्हा सरचिटणीस उबेद शेख आदींनी भुजबळ यांची पाठराखण करीत प्रदेश काँग्रेसने घेतलेल्या निर्णयाचा निषेध केला.

भुजबळ यांनी नगर शहरात कार्यकर्त्यांना सोबत घेवून एक संघपणे, निष्ठेने व प्रामाणिकपणे काम केले आहे. त्यांनी पक्षाचे कार्यक्रम न चुकवता शहरात राबवून पक्षाचे ध्येय धोरण व निर्णय तळागाळात पोहोचविले. गटतट न मानता सर्वांना बरोबर घेऊन शहरात पक्ष जिवंत ठेवण्याचे काम भुजबळ यांनी केलेले आहे.

पक्षाचे काम करताना पक्षांतर्गत गटबाजीचा त्रास त्यांनी सहन केलेला आहे. तरीही विद्यमान प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली भुजबळ यांनी 2003 पासून आतापर्यंत पक्षाचे एकनिष्ठेने काम केले. भुजबळ हे पक्षांतर्गत निवडणुकीत लागोपाठ 2 वेळा शहर ब्लॉक अध्यक्ष झाले आहेत. यामुळे त्यांच्यावर झालेली कारवाईची चुकीची असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

- Advertisment -

ताज्या बातम्या