Monday, April 29, 2024
Homeनगरभुईकोट किल्ल्यातून पहिल्यांदाच 'हिस्टॉरिक रन'

भुईकोट किल्ल्यातून पहिल्यांदाच ‘हिस्टॉरिक रन’

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

अहमदनगर शहरातील (Ahmednagar City) ऐतिहासिक आणि स्वातंत्र्याचा साक्षीदार असलेल्या भुईकोट किल्ल्यातून (Bhuikot Forts) पहिल्यादांच अहमदनगर शहराच्या स्थापनादिनी 28 मे रोजी ऐतिहासिक असा हिस्टॉरिक रन (Historic Run) होणार आहे. अहमदनगर सायकलिंग क्लबतर्फे (Ahmednagar Cycling Club) ह्या हिस्टॉरिक रनचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष गौरव फिरोदिया यांनी दिली. कमांडन मेजर जनरल जीआरएस कहलॉन आणि पोलिस अधीक्षक मनोज पाटील (SP Manoj Patil) यांच्या हस्ते हिस्टॉरिक रनला शनिवारी, 28 मे रोजी पहाटे साडेपाच वाजता झेंडा दाखवला जाणार आहे.

- Advertisement -

अहमदनगर शहराला वैभवशाली इतिहास लाभला आहे. संपूर्ण आशिया खंडात एकमेव अहमदनगर शहराला स्थापना दिन असल्याचे इतिहासाच्या दाखल्यांमध्ये आढळते. येत्या 28 मे रोजी अहमदनगर शहराचा 532 वा स्थापना दिन साजरा होत आहे. यानिमित्ताने अहमदनगर सायकलिंग क्लबतर्फे 28 मे रोजी पहाटे साडेपाच वाजता भुईकोट किल्ल्यातून हिस्टॉरिक रनचे आयोजन करण्यात आले आहे.

पहिल्यांदाच आयोजित हिस्टॉरिक रन यशस्वी होण्यासाठी अहमदनगर जिल्हा प्रशासनाचे सहकार्य लाभत आहे. पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या हिस्टॉरिक रनमध्ये अहमदनगर शहर पोलिस दलातील 65 पोलिस अधिकारी आणि कर्मचारी सहभागी असणार आहेत. त्यात 25 महिलांचा पोलिस अधिकारी आणि कर्मचार्‍यांचा सहभाग असल्याचे फिरोदिया यांनी सांगितले.

या हिस्टॉरिक रनच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर शहर स्थापनेच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 27 मे रोजी सायंकाळी साडेचार वाजता भुईकोट किल्ल्यात एक्स्पो होणार आहे. कमांडन मेजर जनरल जीआरएस कहलॉन, कर्नल एम. के. सिंग, कर्नल जे. एस. तन्वर आणि कर्नल अमित मेहता आदी प्रमुख अधिकारी या एक्स्पोमध्ये सहभागी असतील.

हिस्टॉरिक रनमध्ये 21 किलोमीटर, 10 किलोमीटर आणि साडेपाच किलोमीटर, असे रन होणार आहेत. संपूर्ण मार्गावर अहमदनगर सायकलिंग क्लबतर्फे नियोजन करण्यात आले आहे. याशिवाय पोलिस बंदोबस्त देखील असणार आहे. सहभागी स्पर्धकांना धावताना कोणताही अडथळा येणार नाही, याची पुरेपूर काळजी घेण्यात आली आहे. यात साडेतीन किलोमीटर वॉकेथॉन महिलांसाठी आणि लहान मुलांसाठी स्वतंत्र असणार आहे.

या हिस्टॉरिक रन मध्ये अहमदनगर शहराच्या स्थापनेला 532 वर्ष होत असल्याने प्रथम नोंदणी करणार्‍या 532 जणांना संधी देण्यात आल्याची माहिती सायकलिंग क्लबतर्फे देण्यात आली.

अहमदनगर सायकलिंग क्लबच्या कल्याणी फिरोदिया, मेहेरप्रकाश तिवारी, रवी पत्रे, श्रीकांत लढ्ढा, जितेश माखिजा, दिनेश संकलेचा, गणेश पाटील, महेश मुळेय, तुषार पटवा, प्रसाद बेडेकर, प्राची कळमकर, स्नेहल कुलकर्णी आदी सदस्य हिस्टॉरिक रन आणि एक्स्पो यशस्वी होण्यासाठी नियोजन करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या